अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमान खानने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. यानंतर आता लवकरच सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे सलमान तेलुगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नुकतंच चिरंजीवीने त्यांच्या ट्विटरवर एक फोटो ट्विट केला आहे. यात त्यांनी सलमानचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. त्यासोबतच त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. या चित्रपटात सलमानचे स्वागत करताना चिरंजीवी म्हणाले, ‘गॉडफादर मध्ये तुमचे स्वागत आहे भाऊ. तुमच्या एंट्रीमुळे प्रत्येकाच्या आत एक वेगळीच उर्जा संचारली आहे आणि त्यासोबतच उत्साहाची पातळी आणखी वाढली आहे. तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करणे ही फार मोठी आनंदाची बाब आहे. तुमची उपस्थिती प्रेक्षकांसाठी एक जादू असेल.

What Raj Thackeray Said About Hitler?
राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!

‘गॉडफादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा चित्रपट मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक असेल. काही काळापूर्वी चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान छोट्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता त्याची पुष्टी झाली आहे.

सलमान खान हा लवकरच ‘गॉडफादर’चा भाग होणार असल्याचे ट्विटरवर म्हटलं आहे. सलमान या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. ही भूमिका लूसिफरमधील पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासारखीच असणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज यांनी छोटी भूमिका केली होती.

“हीच ती वेळ…”, ‘द कश्मीर फाइल्स’ वर रितेश देशमुखचे ‘ते’ ट्विट चर्चेत

‘गॉडफादर’ हा पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कंचरण, जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अनुष्का शेट्टी, राम चरण आणि श्रुती हासन देखील दिसणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. तो लवकरच ‘पठाण’, ‘कभी ईद कभी दिवाळी’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.