VIDEOS : असा रंगला भारती आणि आश्काचा मेहंदी सोहळा

मेहंदी कार्यक्रमात कलाकार मित्रांचा कल्ला

Bharti Singh and Aashka Goradia
आश्का गोरडिया, भारती सिंग

रविवारी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी टेलिव्हिजन विश्वातील दोन सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार आहेत. एकीकडे गोव्यात ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंग तिचा प्रियकर हर्ष लिंबाचियाशी तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये टीव्ही अभिनेत्री आश्का गोरडिया प्रियकर ब्रेट गोबलेशी लग्नगाठ बांधणार आहे. सध्या सोशल मीडियावर याच दोन लग्नसोहळ्यांची चर्चा असून दोघांच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये आश्का लाल रंगाचा टॉप आणि पिवळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. तर भारतीने मेहंदी कार्यक्रमात हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. या पारंपरिक कपड्यांवर फुलांच्या माळा उठून दिसत आहेत. बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

भारतीच्या मेहंदी कार्यक्रमात सनाया इरानी, आरजे मलिश्का आणि तृप्ती जाधव हे कलाकार कल्ला करताना दिसत आहेत. राखी सावंतसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती.

शुक्रवारी आश्का आणि ब्रेंटचा ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. रविवारी म्हणजेच उद्या हिंदू पद्धतीने हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

आश्का आणि भारतीचे लग्न एकाच दिवशी असल्याने कोणाच्या लग्नाला हजेरी लावायची असा प्रश्न टेलिव्हिजन कलाकारांना पडला आहे. मौनी रॉय, जुही परमार, करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी आश्काच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत तर ऋत्विक धंजानी, आशा नेगी, सुयश राय, रवी दुबे, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह भारतीच्या लग्नाला हजर राहणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mehendi ceremonies of bharti singh and aashka goradia photos videos

ताज्या बातम्या