बॉलिवूडमधील एका नामांकित फोटोग्राफरवर एका मॉडेलने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अंधेरीत राहणाऱ्या २८ वर्षीय मॉडेलच्या तक्रारीनंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉडेलने वांद्रे पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फोटोग्राफर विरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी, तर इतरांविरुद्ध हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी आणि पोलीस उपायुक्त चैतन्य सिरीप्रोलू यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. अंधेरीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय मॉडेलने बॉलिवूडमधील कलाकारांसोबत काम करणाऱ्या फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. फोटोग्राफर कॉलस्ट ज्युलियनने वर्ष २०१४ आणि २०१८ मध्ये काम मिळवून देण्याची खोटी आश्वासनं देऊन वांद्रे परिसरात बलात्कार केल्याचं मॉडेलने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी २६ मे रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या नावावर करणी सेनेचा आक्षेप, सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी

आरोप केलेल्या मॉडेलने यापूर्वी १२ एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्यावर झालेल्या अत्याचारांची वाच्यता केली होती. कामाच्या वेळी कशापद्धतीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. त्याचबरोबर तिने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं होतं. तिने फोटोग्राफरवर शारीरिक शोषण आणि हल्ला केल्याचा आरोप तिने पत्रातून केला होता.

स्थानिक गावकऱ्यांच्या विरोधामुळे मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले

अभिनेत्रीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी बलात्कार आणि हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असून, आठ आरोपींमध्ये एका प्रख्यात चित्रपट निर्मात्याचा मुलगा, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर आणि एका निर्मात्याचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model files rape molestation case against famous bollywood photographer bmh
First published on: 30-05-2021 at 10:51 IST