गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर मॉडेलिंग विश्वातून बाहेर पडून नन बनलेल्या सोफिया हयातच्या नावाची प्रचंड चर्चा पाहायला मिळाली. आपल्या अतरंगी कारनाम्यांमुळे सोफिया नेहमीच चर्चेचा विषय बनते. ‘बिग बॉस’ या टेलिव्हिजन शोमध्ये झळकल्यानंतर आपले बोल्ड फोटो व्हायरल करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर सोफिया संन्यास घेऊन नन बनल्यानंतरही आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरली.
सोफियाने नुकतंच लग्नदेखील केलं आणि आता पुन्हा एकदा तिने आपल्या पतीसोबतचा एक बोल्ड आणि रोमँटिक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ‘हा आमचा नवीन म्युझिक व्हिडिओ आहे जो आज लाँच झालाय,’ असं कॅप्शन देऊन पुढे ‘ओम शांती ओम’ असंदेखील लिहिलं आहे.
https://www.instagram.com/p/BVPogKxFSzK/
https://www.instagram.com/p/BVM0xpUF4Va/
https://www.instagram.com/p/BU8195olx6G/
वाचा : या टेलिव्हिजन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘भल्लालदेव’
सोशल मीडियावरील आपल्या अतरंगी पोस्टमुळे तिला अनेकदा लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. यापूर्वी तळपायावर स्वस्तिकाचे चिन्ह गोंदवल्यामुळे सोफियावर अनेकांनीच आगपाखड केली होती. हा फोटो पोस्ट करताच कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच सोफियाच्या विरोधात प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
