अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या आगामी ‘नूर’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटातील ‘उफ ये नूर’ या गाण्यानंतर आता या चित्रपटातील ‘मुव्ह युव्हर लक’ बोल असणारे दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सोनाक्षीचे हे गाणे थिरकायला लावणारे असेच आहे. या गाण्यात सोनाक्षी सिन्हासोबत पंजाबी पार्श्वगायक आणि अभिनेता दिलजित दोसांज आणि रॅपर बादशाह दिसत आहेत. या गाण्यात तिघेही स्टायलिश अंदाजात अभिनय करताना दिसतात. गाण्यामध्ये झोपेतून उठलेली सोनाक्षी एकदमच डिस्कोच्या मंचावर थिरकताना दाखविण्यात आले आहे. ४ मिनिटांचे हे गाणे बादशाहने लिहिले असून, सोनाक्षी सिन्हाने हे गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे गाणे शेअर करताना सोनाक्षीने चाहत्यांसाठी एक संदेशदेखील दिला आहे. ‘नूरसोबत थिरकायची वेळ झाली…’अशा आशयाने ट्विट करत सोनाक्षीने प्रेक्षकांना गाण्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्यामध्ये ‘नूर’ची भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीचे खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक रुपांचे दर्शन घडले होते. या गाण्यात नूरच्या स्वभावाचा प्रत्येक पैलू दाखविण्यात आला होता. दुसऱ्या गाण्यामध्ये नूरच्या वागण्यात आणि स्वभावात कमालीचा बदल झाल्याचे दिसले. सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून, पत्रकार म्हणून काम करत असताना, तिच्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

यापूर्वी ‘नूर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत असणाऱ्या सोनाक्षीचे ट्रेलरमध्ये वेंधळे रुप पाहायला मिळाले होते. स्वत:ला विदुषक मानणारी सोनाक्षी पत्रकाराची भूमिका कशी निभावणार, असा प्रश्न ट्रेलरमधून तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार असून, या चित्रपटातील गाण्यातील वेगळेपणानंतर सोनाक्षीची चित्रपटात वेगवेगळी रुपे दिसतील, असे संकेत मिळतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Move your lakk sonakshi sinha diljit dosanjh badshah new song from noor
First published on: 30-03-2017 at 16:52 IST