गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मराठी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहत त्या त्यांचे विचार चाहत्यांची शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी मराठी कलाकारांबद्दल वक्तव्य केलं आहे.

मृणाल कुलकर्णी अभिनयाप्रमाणेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. नुकताच गोवा राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार सोहळा दर्या संगम, कला अकादमी मध्ये ८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रख्यात चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना आमंत्रित केले होते. तेव्हा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या भाषण करताना असं म्हणाल्या, “गोव्यासाठी आम्ही मराठी कलाकार काहीपण करू शकतो, गोव्यातून एक फोन आला की .आम्ही उत्सुक असतो. गोव्यात येण्यासाठी आमची दोन कारणे असतात. त्यातलं पाहिलं कारण म्हणजे या भूमीवर यायला तुम्हाला भेटायला यायला आम्हाला खूप आवडतं. आणि दुसरं म्हणजे या गोव्याच्या भूमीतून इतकं काही शिकण्यासारखं असतं त्यात गोव्याच्या बाहेर आमचं जे जग आहे संवदेना खूप कमी होत चालल्या आहेत. इथे आल्यावर कळत जिव्हाळा म्हणजे काय ओलावा म्हणजे काय, कला म्हणजे काय आणि ती कला रसिक प्रेक्षकांनी अनुभवणं म्हणजे काय, म्हणूनच मी एक माणूस म्हणून कलाकार म्हणून मला गोव्याला यायला खूप आवडतं.”

७०-८० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री झीनत अमान यांची नवी सुरुवात; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

त्या पुढे म्हणाल्या, “गोवा आम्हाला आणखीन एक गोष्ट शिकवतं ते म्हणजे नम्रपणा, बाहेरचे कलाकार आम्ही इथे येतो आणि इथल्या कलाकरांना बघतो, त्यांची कला अनुभवतो त्याचा आस्वाद घेतो तेव्हा असं वाटतं इतर कलाकरांना मराठी भाषेत सांगायचं तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या पुणे मुंबईकडच्या आम्हा कलावंतांना नम्रता म्हणजे काय हे गोव्यात येऊन कळतं. कित्येक नाट्यसंस्था इथे काम करत आहेत. त्यानं आजवर ओळख मिळालेली नाही किंवा ते टीव्हीवर आलेले नाहीत मात्र त्यांची निष्ठा इतकी मोठी आहे की ती भल्याभल्याना जमणार नाही.”

मृणाल कुलकर्णी यांनी गोव्यातील कलाकारांचे कौतुक तर केलेच मात्र गोवेकरांचे आभारदेखील मानले. या कार्यक्रमाला गोव्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहिली होती. तसेच या पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारदेखील ठेवण्यात आला होता.

Story img Loader