IPL 2024 Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात केकेआरने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. मुंबईवरील विजयासह केकेआऱचा संघ आय़पीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरला आहे. पावसामुळे हा सामना १६-१६ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १५७ धावा केल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने ४२ धावांची तर नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि पियुष चावला यांनी २-२ विकेट घेतले आहेत. मुंबई इंडियन्स संघ २० षटकांत केवळ १३९ धावा करू शकला.


मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर तिलक वर्माने ३२ धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर सर्व फलंदाज केकेआरच्या गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, हर्षित राणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. तर सुनील नरेनने एक विकेट मिळवली.

Live Updates

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Score, IPL 2024: मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा केकेआरने बाजी मारत मुंबईचा १८ धावांनी पराभव केला.

00:32 (IST) 12 May 2024
KKR vs MI: कोलकाताने मारली बाजी

अटीतटीच्या सामन्यात अखेरीस केकेआरने बाजी मारत मुंबईचा १८ धावांनी पराभव केला आणि आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईने फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली खरी पण संघाला आपली खेळी कायम ठेवता आली नाही. वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर केकेआरने पुनरागमन केले. मुंबईच्या तरूण फलंदाजांनी तिलक वर्मा आणि नमन धीर कडवी झुंज दिली पण केकेआरने बाजी मारली.

00:21 (IST) 12 May 2024
KKR vs MI: १४ व्या षटकात तिलक वर्माची शानदार फटकेबाजी

१४ व्या षटकात तिलकने दोन चौकार आणि एका षटकारासह १६ धावा केल्या. पण या षटकाच्या अखेरीस अतिरिक्त धाव चोरताना नेहल वधेरा ३ धावा करत बाद झाला.

00:12 (IST) 12 May 2024
KKR vs MI: पंड्या आणि टीम डेव्हिड बाद

वरूण चक्रवर्तीच्या १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्या २ धावा करून झेलबाद झाला तर पुढच्याच षटकातील रसेलच्या पहिल्या चेंडूवर टीम डेव्हिडही खाते न उघडता बाद झाला.

00:02 (IST) 12 May 2024
KKR vs MI: सूर्या झेलबाद

रोहित शर्मा इशानपाठोपाठ सूर्याही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रसेलच्या ११ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्या मोठा फटका खेळत असताना सीमारेषेवर झेलबाद झाला.

23:58 (IST) 11 May 2024
KKR vs MI: १० षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

१० षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २ बाद ८१ धावा आहे. मैदानात सध्या मुंबईकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवची जोडी आहे. यासह मुंबईला ३६ चेंडूत ७७ धावांची आवश्यकता आहे.

23:49 (IST) 11 May 2024
KKR vs MI: वरूणच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद

वरूण चक्रवर्तीच्या आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूने बॅटची कड घेत हवेत उडाला आणि रोहित बाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने २४ चेंडूत एक चौकार एक षटकारासह १९ धावा केल्या. यासह मुंबईने आठ षटकांनंतर २ बाद ७१ धावा केल्या.

23:44 (IST) 11 May 2024
KKR vs MI: इशानच्या रूपात केकेआरला मिळाली पहिली विके

सुनील नरेनच्या सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी इशानने २२ चेंडूत ५ चौ२कार आणि षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. या विकेटसह सुनील नरेनच्या १५० आयपीएल विकेट्स पूर्ण झाल्या आहेत.

23:31 (IST) 11 May 2024
KKR vs MI: पॉवरप्लेमध्ये इतक्या धावा

रोहित शर्मा आणि इशान किशनच्या जोडीने बिनबाद ५९ धावा केल्या. रोहित शर्मा १५ धावांवर तर इशान किशन ३७ धावांवर खेळत आहे.

23:14 (IST) 11 May 2024
KKR vs MI: रोहित-इशानची फटकेबाजी

रोहित शर्मा इशान किशनची जोडी मैदानात असून दोघांनी २ षटकांत १७ धावा केल्या आहेत. वैभव अरोराच्या पहिल्या षटकात ६ धावा केल्या तर मिचेल स्टार्कच्या दुसऱ्या षटकात ११ धावा केल्या.

23:06 (IST) 11 May 2024
KKR vs MI: मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरूवात

केकेआरने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात उतरले आहेत. तर कोलकाता कडून वैभव अरोरा गोलंदाजीला सुरूवात करेल.

22:53 (IST) 11 May 2024
KKR vs MI: केकेआरचे मुंबईला इतक्या धावांचे लक्ष्य

केकेआरने १६ षटकांच्या सामन्यात ७ बाद १५७ धावा केल्या. यासह केकेआरने मुंबईला विजयासाठी १५८ धावांचे आव्हान दिले आहे. अखेरच्या चेंडूवर रमणदीपने षटकार लगावत संघाची धावसंख्या १५० पार नेली. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर केकेआरचे सलामीवीर फेल ठरले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूत ४२ धावा केल्या. तर नितीश राणानेही महत्त्वपूर्व ३३ धावांची खेळी केली. पण अंशुल कंबजोच्या जबरदस्तक थ्रोवर तो धावबाद झाला. त्यानंतर रसेल (२४) आणि रिंकूने (२०) संघाच्या धावसंख्येत भर घातली. तर रमणदीप सिंगने पुन्हा एकदा डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. त्याने ८ चेंडूत १७ धावा करत संघाला १५७ धावांता टप्पा गाठून दिला.

मुंबईकडून चावला आणि बुमराहने प्रत्येकी २ आणि तुषारा, अंशुलने १-१ विकेट घेतली.

22:50 (IST) 11 May 2024
KKR vs MI: बुमराहच्या खात्यात दुसरी विकेट

सामन्यातील अखेरच्या १६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिंकू सिंग बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी रिंकूने १२ चेंडूत २ षटकारांसह २० धावा केल्या.

22:40 (IST) 11 May 2024
KKR vs MI: पियुष चावलाने रसेलला केलं बाद

पियुष चावलाच्या १३व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आंद्रे रसेल मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. चावलाच्या फिरकीवर बाद होण्यापूर्वी रसेलने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या.

22:30 (IST) 11 May 2024
KKR vs MI: अंशुल कंबोजचा धारदार थ्रो

बुमराहच्या १२व्या षटकात नितीश राणा अंशुल कंबोजच्या धारदार थ्रो वर बाद झाला. अगदी थोड्या फरकासाठी नितीश राणा धावबाद झाला, धाव घेता घेता थांबल्याने राणा वेळेत पोहोचू शकला नाही आणि बाद झाला. राणाने बाद होण्यापूर्वी २३ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या.

22:16 (IST) 11 May 2024
KKR vs MI: १० षटकांनंतर केकेआरची धावसंख्या

केकेआरने १० षटकांनंतर ४ बाद ९७ धावा केल्या आहेत. केकेआरकडून सॉल्टने ६ धावा, व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ४२ धावा तर श्रेयसने ७ धावांचे योगदान दिले आहे. सध्या मैदानात नितीश राणा आणि आंद्रे रसेलची जोडी कायम आहे.

22:07 (IST) 11 May 2024
KKR vs MI: चावलाच्या फिरकीमध्ये व्यंकटेश अय्यर अडकला

केकेआरचा डाव उचलून धरणारा व्यंकटेश अय्यर पियुष चावलाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी व्यंकटेशने २१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. ९ षटकांंनंतर केकेआरने ४ बाद ८७ धावा केल्या आहेत.

21:54 (IST) 11 May 2024
KKR vs MI: पाच षटकांचा पॉवरप्ले

केकेआरने पाच षटकांत ३ बाद ४५ धावा केल्या. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाल्याने षटके कमी झाली. १६ षटकांचा सामना असल्याने पाच षटकांचा पॉवरप्ले खेळवण्यात आला आहे.

21:45 (IST) 11 May 2024
KKR vs MI: श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड

अंशुल कंबोजच्या पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला. श्रेयसला कळण्याआतच चेंडू स्टंपला लागून गेला. श्रेयस अय्यर १० चेंडूत एका चौकारासह १० धावा करत बाद झाला.

21:26 (IST) 11 May 2024
KKR vs MI: सुनील नरेन क्लीन बोल्ड

बुमराहच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर तुफान फॉर्मात असलेला सुनील नरेन गोल्डन डकवर क्लीन बोल्ड झाला. नरेनने बुमराहचा यॉर्कर चेंडू सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि चेंडूने थेट त्रिफळा उडवला.

https://www.instagram.com/reel/C61YKgEJhqG/?igsh=MTJlZWtyNjcwZTJvaw==

21:24 (IST) 11 May 2024
KKR vs MI: पहिल्याच षटकात विकेट

पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर फिलिप सॉल्ट झेलबाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अंशुल कंबोजने एक शानदार झेल टिपला

21:24 (IST) 11 May 2024
KKR vs MI:

केकेआऱच्या डावाला सुरूवात झाली आहे. फिलिप सॉल्ट आणि सुनील नरेनची जोडी मैदानात आली आहे. तर मुंबईकडून नुवान तुषारा गोलंदाजीला सुरूवात करत आहे.

21:10 (IST) 11 May 2024
KKR vs MI: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

इम्पॅक्ट प्लेअर- रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय

21:09 (IST) 11 May 2024
KKR vs MI: कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग इलेव्हन

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर- अनुकुल रॉय, वैभव अरोरा, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी

21:01 (IST) 11 May 2024
KKR vs MI: नाणेफेक

मुंबई-कोलकाता सामन्याची नाणेफेक हार्दिक पंड्याने जिंकली असून मुंबईचा संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे तर कोलकाताचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या सामन्यातील सारखाच संघ खेळणार आहे. तर कोलकाताच्या संघात अंगक्रिश रघुवंशीच्या जागी नितीश राणाला संघात संधी दिली आहे.

20:42 (IST) 11 May 2024
KKR vs MI: सामन्याची षटके कमी झाली

मुंबई इंडियन्स आणि कोलकाताविरूद्ध सामन्याची नाणेफेक ९ वाजता होणार आहे. तर ९.१५ वाजता सामना सुरू होईल. पावसामुळे उशिरा सामना सुरू होत असल्याने प्रत्येकी १६ षटकांचा सामना खेळवला जाणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1789312129436098661

20:17 (IST) 11 May 2024
KKR vs MI: खेळाडू मैदानात उतरले

पावसाच्या विश्रांतीनंतर आता मैदानातून कव्हर्सही हटवण्यात आले आहे. दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर परतले आहेत. पंच पुन्हा एकदा ८.४५ वाजता मैदानाची पाहणी करतील आणि सामना कधी सुरू होणार याबाबत अपडेट दिले जातील.

19:48 (IST) 11 May 2024
KKR vs MI: पाऊस थांबला

ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असून थोड्याच वेळात नाणेफेक होऊन सामन्याला सुरूवात होणार आहे. या ब्रेकदरम्यान दोन्ही संघांचे काही खेळाडू एकत्र बसून चर्चा करताना दिसत आहेत. रोहित शर्मा केकेआरच्या खेळाडूंसोबत गप्पा मारताना दिसला.

19:06 (IST) 11 May 2024
KKR vs MI: पावसामुळे नाणेफेक उशिराने होणार

मुंबई आणि कोलकातामधील सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पावसामुळे नाणेफेक उशिराने होणार आहे.

18:32 (IST) 11 May 2024
KKR vs MI : रोहित शर्माचा ईडन गार्डन्सवरील रेकॉर्ड

रोहित शर्माची बॅट ईडन गार्डन्सवर चांगलीच तळपते आहे. आतापर्यंत या मैदानावर रोहितची सरासरी ४६.६० आणि स्ट्राईक रेट १४३.३८ आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांत फॉर्मात नसलेल्या रोहितने या मैदानावर पुनरागमन करावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असणार आहे.

17:39 (IST) 11 May 2024
KKR vs MI: गंभीरसाठी भावूक झाला चाहता

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता गौतम गंभीरने मार्गदर्शक म्हणून पुनरागमन केले आहे. आयपीएल २०२४ मध्येही केकेआरची कामगिरी चांगली झाली आहे. यादरम्यान आता गौतम गंभीरसमोर एक चाहता भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO : गंभीरच्या मार्गदर्शनाखालील केकेआरच्या कामगिरीने भारावला चाहता, गौतमसमोर बोलताना अश्रू अनावर

आयपीएल २०२४ कोलकाता नाईट रायडर्स वि मुंबई इंडियन्स लाइव्ह मॅच स्कोअर

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Highlights: आयपीएल २०२४ मधील ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात मुंबईला पराभूत करत केकेआरचा संघ  यंदाच्या मोसमात प्लेऑफचे तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.