आगामी ‘जंजीर’ चित्रपटातील ‘मुंबई का हिरो’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. चित्रपटात मुख्य भूमिका असलेला रामचरण आणि प्रियांका गाण्यामध्ये स्टायलिश पोलिसांच्या वेशात आहेत. गाण्याच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या शैलीत रामचरण “मै आ गया हू तेजा, मै तुम्हे बताने आया हू के मै तुम्हे खत्म कर दूँगा” असे बोलताना दिसतो. दबंग चित्रपटाप्रमाणे पट्टयाला हात लावण्याची स्टाइलही प्रियांका आणि रामचरणने केली आहे. मुंबई का हिरो गाणे मिका सिंगने गायले आहे.
तेलगू चित्रपटसृष्टीतला आघाडीचा नायक राम चरण या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. विजय (राम चरण) आणि शेरखान (संजय दत्त) हे दोघे मिळून मुंबईला गुन्हेगारीमुक्त करतात, असे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘जंजीर’चा हा रीमेक ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.