रेश्मा राईकवार

भयकथेसाठी आवश्यक तो सगळा जामानिमा एकत्र करायचा आणि मग त्यासदृश्य ध्वनी, छायाचित्रणाचा खेळ, ठरावीक धाटणीतली भिंतीवर चढणारी-अनेकदा सरपटणारी भुतं अशी तीच तीच दृश्यं… हे सगळं ठरवून मांडलं की तो उत्तम भयपट होतो, असा एक समज भयपटकारांमध्ये निर्माण झाला आहे बहुधा. त्यातल्या त्यात ताजेपणा म्हणून त्याला मॉरिशससारख्या सर्वांगसुंदर निसर्ग ठिकाणाची जोड दिली की प्रेक्षक भयपटात नाही तर किमान समोरच्या दृश्यात दिसणाऱ्या निसर्गात तरी हरवून जाईल, असा काहीसा भाबडेपणा असावा. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘ए-ाा’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असूनही ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झालेल्या ‘दिब्बुक’ या चित्रपटाला भयपटाचा थरार काही रंगवता आलेला नाही.

मॉरिशसमध्ये ज्यू पंथियांमधील सर्वात जुन्या, हुशार अभ्यासकाचा मृत्यू झाला आहे. त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्या घरात शिरणाऱ्या अनेक माणसांमधून एका माणसाबरोबर कॅमेराही आपल्याला घरात घेऊन येतो. आणि खोल्या दर खोल्या मागे टाकत एका ठिकाणी टेबलावर असलेली नक्षीकाम के लेली लाकडी पेटी दाखवतो. ही देखणी पेटी आधी एका संग्राहकाच्या दुकानात दाखल होते. वरवर शांत – सुंदर दिसणारी ही पेटी आत कु ठलंतरी मोठं वादळ दडवून बसली आहे. ज्याची मुळं पार ज्यू पंथांच्या प्रचलित जुन्या तंत्रविद्येच्या पद्धती आणि इतिहासात दडली आहेत. ज्यूंचा इतिहास, त्यांच्या अस्तंगत झालेल्या पद्धती… ऐकून आणि एखाद दृश्य पाहून आपल्याला काहीतरी ‘एन्जल्स अ‍ॅण्ड डेमॉन’ इतकं  नाही पण त्या धर्तीवर काहीतरी पहायला मिळणार असं उगाचंच वाटत राहतं. पुढच्या काही सेकं दात तोही भ्रम गळून पडतो. तर अशी ही पेटी ज्याला ज्यू लोक ‘दिब्बुक’ असं संबोधतात ती पेटी आणि त्यातलं भूत मुंबईतलं सगळं घरदार सोडून मॉरिशसमध्ये नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी आलेल्या आपल्या नायक-नायिके च्या देखण्या भव्य वास्तूत दाखल होतं. ज्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराशी पूर्णपणे एकरूप झालेला नाही, त्याला हे भूत झपाटून टाकतं. इथे ते नेहमीप्रमाणे पहिल्यांदा नायिके ला झपाटून टाकतं. मग अर्थात योगायोगाने नायकाचे एका फादरशी लहानपणापासून सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे ते या घरात दाखल होतात. दिब्बुकची भीती दाखवून झाल्यावर मग दिग्दर्शक जय के  यांनी सुरुवातीला एक विचित्र व्यक्तिमत्त्वाची मोलकरीण, नायिकेला पाहून भुंकणारा कुत्रा, कधीतरी ते घरच जणू भुताने झपाटलेले असावेत अशा व्यक्तिरेखा आणि दृश्यांची पेरणी के ली आहे. आणखी एक चांगला पैस दिग्दर्शकाने नुसताच वापरून वाया घालवला आहे तो म्हणजे मॉरिशसच्या भूमीचा वापर आण्विक कचऱ्याच्या विघटनासाठी के ला जाणार आहे. याचा या भयकथेशी काय संबंध?, असा विचार तुमच्या मनात येणं सहज शक्य आहे. अर्थात हा चित्रपट मॉरिशस सरकारबरोबरच्या संयुक्त निर्मितीतून करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख कथाविषयात करण्यात आला असावा, तो नेहमीप्रमाणे तोंडी लावण्यापुरताच असल्याने त्याचाही फार विचार करून फायदा नाही.

‘दिब्बुक’चे लेखन जय के  आणि चिंतन गांधी यांचे आहे. मूळ मल्याळम चित्रपटही जय के  यांनीच दिग्दर्शित के लेला आहे. नाही म्हणायला ज्यू पंथाचा इतिहास, त्यांच्या तंत्रविद्येच्या संकल्पना-प्रथा अशा काही नव्या गोष्टींचा समावेश त्यांनी कथेत के ला आहे. या भयकथेला किं वा त्यातल्या वाईट शक्तीच्या कथेला एका प्रेमकथेचा आधार आहे. ए-ाा आणि नोरा यांच्या प्रेमकथेचा. एक ज्यू आणि एका ख्रिश्चान मुलीच्या प्रेमाला ए-ााच्या वडिलांच्या कट्टर धार्मिक भावनेमुळे वळण मिळते. हे सगळेच संदर्भ किं वा मॉरिशसमध्ये आण्विक कचऱ्याच्या विघटन प्रकल्पाला होणारा विरोध असो याचा उत्तम वापर करणे लेखक – दिग्दर्शकद्वयीला शक्य होते. मात्र तसा प्रयत्नच के ला गेलेला नाही. त्याउलट हा सगळा नवा वाटणारा फापटपसारा त्याच त्याच भूतकथेला उगाच नवा साज चढवण्यात दिग्दर्शकाने व्यर्थ घालवला आहे. हे सगळेच संदर्भ चित्रपटाच्या अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये येऊन जातात. इथे भुताला बंदिस्त करायलाही फादरचा उपयोग होत नाही, मग रबाई या ज्यू धर्मगुरूंना बोलावले जाते. नायक-नायिके च्या भूमिके साठीही फार मेहनत घेतली गेलेली नाही. इम्रान हाश्मी आणि निकिता दत्त यांचा अभिनय उत्तम आहे किं वा त्यांच्या अभिनयाने या भयपटाला काही फरक पडला असता असे काही वाटत नाही. त्याउलट, ए-ााच्या भूमिके त नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहला कितीतरी दिवसांनी चित्रपटात पाहण्याची संधी या चित्रपटात आहे, मात्र कथेच्या केंद्रस्थानी असूनही त्याच्या वाट्याला फारच तोकडी भूमिका आली आहे. रुबाई मार्कसच्या भूमिके त अभिनेता मानव कौल यांनी त्यांना मिळालेल्या वेगळ्या भूमिके चे सोने के ले आहे. त्यांच्या वडिलांच्या भूमिके त असलेले अनिल जॉर्ज आणि फादर गॅब्रियलच्या भूमिके तील डेन्झिल स्मिथ या दोन्ही चांगल्या कलाकारांनाही फार वाव देण्यात आलेला नाही. एकू णच भयकथेचा काही वेगळा अंदाज घेऊन आल्याचा दावा करणारा हा ‘दिब्बुक’ वास्तवात फारच पोकळ खेळ मांडतो.

दिब्बुक

दिग्दर्शक – जय के , कलाकार – इम्रान हाश्मी, निकिता दत्त, मानव कौल, इमाद शाह, डेन्झिल स्मिथ, अनिल जॉर्ज, दर्शना बनिक, युरी सुरी.