‘इंडियन आयडल’ या शोने आजवर अनेक गायकांना देशातील मोठे गायक बनवले आहेत. या नवीन सत्रामध्ये देखील प्रेक्षकांचे संगीताबद्दलचे प्रेम अधिक वाढावे यासाठी इंडियन आयडलने पूर्ण तयारी केली आहे. या सत्रातील स्पर्धक तर अत्यंत प्रतिभावान आहेत. या वीकएंडला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील प्यारेलाल जी हजेरी लावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन आयडल टीमने याच कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्यारे लालजींसोबत काम केलेले आहे. त्यांनी सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे शोमध्ये सांगितले आहे. त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाबद्दल ऐकून शोची परिक्षक नेहा कक्करला खूप वाईट वाटले आणि तिने संतोष जींना ५ लाख रुपये देण्याचे ठरवले. तिच्या मते संतोष जी हे संगीत उद्योगातील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची तयारी तिने दर्शवली. त्यांची कहाणी ऐकून ती भावुक झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar help senior lyricist santosh anand avb
First published on: 18-02-2021 at 18:12 IST