बॉलिवुडचं सर्वात हॉट कपल रणवीर आणि दीपिका यांचा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा फॅमिली फोटो समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी, फाईंडीग फॅनी या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यांच्या लग्नाची उत्सुकता ताणली गेली कारण त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊनही त्याचे फोटो काही प्रसारित झाले नव्हते. अखेर गुरुवारी दीपिकाने तिच्या इंस्टा अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले. यानंतर आज एक नवा फोटो समोर आला आहे. दीपिकाने जेव्हा लग्नाचे दोन फोटो पोस्ट केले तेव्हा ते काही क्षणात व्हायरल झाले. त्याचप्रमाणे हा नवा फॅमिली फोटोही व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिका रणवीरचा फॅमिली फोटोही व्हायरल

१४-१५ नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका-रणवीरने लग्नाची गाठ बांधली. यावेळी या जोडीने कोंकणी आणि सिंधी दोन्ही पद्धतीने लग्न केलं असून त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे आता गेल्या तासाभरापासून या फॅमिली फोटोचीही चर्चा सुरु झाली आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New photo of deepika padukone ranveer singh with their friends family after getting married
First published on: 16-11-2018 at 21:39 IST