दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे व लेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या ‘रायरंद’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी वेगळीच भरारी घेतली आहे. नुकत्याच नोएडा येथे संप्पन झालेल्या ४ था नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘रायरंद’ चित्रपटाला ‘विशेष एक्सलन्स पुरस्कार’ मिळाला आहे. या चित्रपटाचे खास स्क्रीनिंगही नोएडा येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. चित्रपटाला नोएडा रसिकांची प्रचंड दाद मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या “रायरंद” या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगर जिल्ह्यात झाले असून जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. “रायरंद” या चित्रपटात बहुरूपी व बालमजुरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे. श्रीरामपूरचे कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य ‘रायरंद’ची भूमिका साकारली आहे. अभिनेता आनंद वाघ यांनी या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. तसेच आशिष निनगुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. गीतलेखन भावेश लोंढे व आशिष निनगुरकर यांचे आहे.

या चित्रपटात अनंत जोग, रणजित कांबळे,श्यामकुमार श्रीवास्तव, आशिष निनगुरकर, करण कदम, आनंद वाघ, अजित पवार, प्रवीण भाबळ, सुनील जैन, सुरेश दाभाडे, रेखा निर्मळ, गोरख पठारे, झाकीर खान, राजू ईश्वरकट्टी, नाना शिंदे, संतोष चोरडीया, स्वप्नील निंबाळकर, फिरोज खान, सुभाष कदम व अनुराग निनगुरकर आदींच्या भूमिका आहेत तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे असून कॅमेरामन राजेश वाव्हळ, कलादिग्दर्शक सुभाष कदम, संगीतकार विकास जोशी, कार्यकारी निर्माते भावेश लोंढे व सहकारी अमेय शेणवी व प्रतिश सोनवणे असून संकलक व पोस्ट प्रॉडक्शन हेड अजित देवळे यांनी केले आहे. ‘रायरंद’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याअगोदर ‘नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये या सिनेमाचा गौरव झाल्याने या चित्रपटातील कलावंत व तंत्रज्ञ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noida international film festival marathi movie raayrand
First published on: 25-02-2017 at 22:22 IST