कॉमेडियन कपिल शर्मा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर कपिलने आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’द्वारे ओटीटीवर पदार्पण केलंय. कपिलचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेऊ शकतात.

कपिल शर्माचे अनेक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु, आता त्याच्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. कपिल त्याच्या कुटुंबासमवेत मुंबई विमानतळावर दिसला. कपिलला पापाराझींच्या घोळक्याने घेरलं. पापाराझी त्यांचे फोटो काढत असतानाच त्याची लेक अनायरा कपिलला म्हणाली, “बाबा तुम्ही बोलला होता की कोणीच आपले फोटो काढणार नाही.”

हेही वाचा… “आए हाए, ओए होए… बदो बदी” या व्हायरल गाण्याची पडली ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडेला भुरळ; व्हिडीओ व्हायरल

अनायराची तक्रार ऐकताच कपिल, त्याची पत्नी आणि पापाराझींमध्ये एकदमच हशा पिकला. तितक्यात कपिलची पत्नी गिन्नी चतरथ मुलीला म्हणाली की, “अनायरा सगळ्यांना टाटा कर आणि शुभ रात्री म्हण.”

कपिल शर्माच्या लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ती शेवटी कपिलची मुलगी आहे, विनोद तिच्या रक्तात आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “मुलं नेहमी खरं बोलतात.”

हेही वाचा… “पाय दुखायला लागले पण…”, पहिल्याच हिंदी सिनेमात ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला मिळाली होती ‘अशी’ वागणूक; म्हणाले, “चिखलाच्या…”

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथने १२ डिसेंबर २०१८ मध्ये जालंधरला लग्नगाठ बांधली. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अनायराच्या जन्माची गुड न्यूज दिली. २०२१ मध्ये या कपलने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत केलं आणि त्याचं नाव त्रिशान ठेवलं.

हेही वाचा… लग्नाच्या तीन वर्षानंतर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री जाणार सासरी; गुड न्यूज देत म्हणाली, “मी खूप…”

दरम्यान, कपिलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर कपिलने नुकतंच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या सीझनचं शूट पूर्ण केलं आहे. गेल्या महिन्यात याबाबत अर्चना पूरन सिंहने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या सेटवर पहिला सीझन पूर्ण झाल्याने केक कापला होता. “सीझन रॅप” असं कॅप्शनदेखील तिने या पोस्टला दिलं होतं.