यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, सहायक अभिनेता, अभिनेता, सिनेमॅटोग्राफी, फिल्म ए़डिटिंग व ओरिजनल स्कोअर असे एकूण सात पुरस्कार ‘ओपनहायमर’ने मिळवले आहेत. ख्रिस्तोफर नोलनचा बहुचर्चित चित्रपट सिनेरसिकांना आता मोफत पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

सामान्य प्रेक्षक, नोलनचे चाहते तसेच चित्रपट समीक्षक यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. चित्रपटातील काही सीन्समुळे तसेच भगवद्गीतेच्या संदर्भामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. चित्रपटगृहामध्ये सुपरहीट ठरलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार अशी चर्चा रंगली होती.

आणखी वाचा : इमरान हाश्मी बनणार ‘डॉन ३’चा खलनायक; खुद्द अभिनेत्यानेच इंस्टाग्राम पोस्टमधून केला खुलासा

त्यानंतर काही मीडिया रीपोर्टनुसार अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘ओपनहायमर’चे हक्क विकत घेतले असून याच प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली. ठरल्याप्रमाणे हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला खरा, पण तो पाहण्यासाठी वापरकर्त्यांना अतिरिक्त शुल्क आकारावे लागणार होते.

पण आता मात्र ‘ओपनहायमर’ आणखी एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच ‘जिओ सिनेमा’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘ओपनहायमर’ची रिलीज डेट शेअर केली आहे. येत्या २१ मार्चपासून हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये मोफत पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘ओपनहायमर’ला तब्बल ७ पुरस्कार मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर लंडनमध्ये पार पडलेल्या बाफटा पुरस्कार सोहळ्यात देखील या चित्रपटाने ७ पुरस्कार पटकावले आहेत. प्राइम व्हिडीओनंतर आता ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppenheimer will be available for free streaming on jio cinema avn