ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर महिन्याच्या सुरुवातीला ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता १७ मे रोजी आणखी काही कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. खरं तर ओटीटीवर दर आठवड्याला कोरियन, इंग्रजी, हिंदी, दक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट व सीरिज येतात. आता मे महिन्याच्या तिसऱ्या वीकेंडला ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. या शुक्रवारी ओटीटीवर बरेच चित्रपट अन् सीरिज रिलीज होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटापासून ते ‘मडगांव एक्सप्रेस’ पर्यंत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये विकी कौशल व सारा अली खानच्या एका चित्रपटाचा समावेश आहे, हा चित्रपट तब्बल ११ महिन्यांनी ओटीटीवर येणार आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

मॅडम वेब

डकोटा जॉन्सनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका महिला शास्त्रज्ञाविषयी आहे, जी एका कोळीच्या शोधात आहे. त्या कोळीने सोडलेल्या रसायनांमध्ये माणसांना बरं करण्याची अद्भुत शक्ती आहे. ही सीरिज १७ मे पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

मॉन्स्टर

मॉन्स्टर ही नेटफ्लिक्सची सीरिज आहे. यात थ्रिलर आणि सस्पेन्सचा मिलाफ असेल, ही इंडोनेशियन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड

एसएस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ आता ॲनिमेशन सीरिजच्या रुपात पाहता येणार आहे. महिष्मती सिंहासनासाठी प्रभास आणि राणा दग्गुबती यांच्यातील ही लढाई तुम्ही १७ मे रोजी हॉटस्टारवर पाहू शकता.

जरा हटके जरा बचके

‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट गेल्या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. ११ महिन्यांनंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १७ मे पासून जिओ सिनेमावर विकी कौशल आणि सारा अली खान यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

बस्तर: द नक्सल स्टोरी

हा चित्रपट १५ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरनंतर हा चित्रपट आता ZEE5 वर १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

मडगांव एक्सप्रेस

गोव्याला फिरायला जाणाऱ्या तीन मित्रांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात कुणाल खेमू, अविनाश तिवारी व दिव्येंदू शर्मा तसेच अभिनेत्री नोरा फतेही आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

स्वातंत्र्य वीर सावरकर

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १७ मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swatantra veer savarkar madgaon express movies and web series releasing on ott netflix zee 5 this friday hrc