‘पोस्टर बॉईज’, ‘गुलाबजाम’, ‘भारत’ यांसारखे सुपरहिट मराठी-हिंदी चित्रपट एकीकडे, तर दुसरीकडे ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ अथवा ‘मिरर कॅ्रक’सारखी नाटकेही त्याच आत्मीयतेने करणारी प्रयोगशील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘पेन्शन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे. पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ यांनी दिग्दर्शित ‘पेन्शन’ या चित्रपटात सोनालीबरोबर सुमीत गुट्टे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट नुकताच ‘इरॉस नाऊ ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

Ulta-Chashma
उलटा चष्मा: नवी ‘भूमिका’
Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून

‘पेन्शन ही इंद्र या एका लहान मुलाची गोष्ट असून मी त्याच्या आईची भूमिका करते आहे. या चित्रपटात त्या लहान मुलाचा तारुण्याकडे होणारा प्रवास मांडण्यात आला आहे. आयुष्यात त्याच्यासमोर येणारी वेगवेगळी आव्हाने आणि त्यावर तो कसा विजय मिळवतो हे अत्यंत रंजक पद्धतीने यात मांडण्यात आले आहे. पुंडलिकने मला ही कथा ऐकवल्यावर त्यातील आई डोळ्यांसमोर उभी राहिली. मीसुद्धा एक आई असल्याने ही भूमिका चांगल्या पद्धतीने स्वत:शी जोडू शकले. या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे तिने सांगितले. खूप दिवसांनंतर ओटीटीवर का होईना मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचा आनंदही होत असल्याची भावना तिने व्यक्त केली.

चित्रपटात जसं आईला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याप्रमाणे सोनालीलाही वैयक्तिक आयुष्यात सांसारिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल साधण्याची कसरत करावी लागते आणि आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने ती हे आव्हान लीलया पेलते. तिला कावेरी ही छोटी मुलगी असून तिच्या सुट्टीनुसार ती  चित्रीकरणाचे वेळापत्रक ठरवते. भोरला ‘पेन्शन’चे चित्रीकरण पाहण्यासाठी कावेरी आली होती. तेव्हा आईसोबत हा छोटा मुलगा कोण याचे तिला कुतूहल वाटत होते. तिने अजून चित्रपट पाहिला नाही, मात्र चित्रपटातील एक दृश्य पाहताना तिला खूप प्रश्न पडले होते. आईला पडद्यावर पाहताना तिला अत्यंत आनंद होत असल्याचेही सोनालीने सांगितले.

हिंदीप्रमाणेच मराठीतही आता ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती होत आहे. इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांच्या व्यावसायिक स्पर्धेत मराठीची गळचेपी होते. माझे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहापेक्षा ओटीटीवरच जास्त पाहिले. मराठीत ओटीटीची निर्मिती झाल्यास मराठी चित्रपटांना वेगळे व्यासपीठ लाभेल, असे स्पष्ट मत सोनालीने व्यक्त केले.

येत्या काळात सोनालीचे आणखी दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या एका वेबमालिकेचे चित्रीकरण सुरू असून हिंदी चित्रपटातही काम केले असल्याचे तिने सांगितले. सोनालीचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सगळ्या चित्रीकरणाच्या घाईगडबडीत ती नाटक विसरलेली नाही. नाटकांना आधीसारखा प्रेक्षकांचा पुन्हा प्रतिसाद मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असल्याचे तिने सांगितले. मी ‘मिरर कॅ्रक’सारखे इंग्रजी नाटक केले. ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ या मराठी नाटकाचा परदेशी दौरा होता, मात्र करोनामुळे तो रद्द करावा लागला. तर ‘गर्दीश के तारे’ हा कार्यक्रम ती करत होती, यात मी गीता दत्तची भूमिका करत होते. मात्र मधल्या काळात माझा संगीतकार मित्र नरेंद्र भिडे याचे निधन झाले. त्याचे जाणे आमच्यासाठी अनपेक्षित होते. त्याच्याशिवाय कार्यक्रम करण्याचा मी विचारच करू शकत नाही. माझ्या कार्यक्रमातील तो महत्त्वाचा दुवा होता, असे तिने सांगितले. त्यामुळे नाटक आणि कार्यक्रम पुन्हा रुळावर येईपर्यंत तरी ती सध्या चित्रपट आणि वेबमालिकांमध्ये व्यग्र राहणार असल्याचे सांगते.