या ठिकाणी होणार विरुष्काचे लग्न?

त्यांच्या लग्नाच्या बातम्यांकडेच आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे

virat, anushka
विराट कोहली, अनुष्का शर्मा

आतापर्यंत अनुष्का आणि विराटला क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान किंवा पार्टीमध्ये एकत्र पाहिले आहे. विराटने त्याचे अनुष्कासाठीचे प्रेम अनेकदा मान्य केले. पण अनुष्काच्या तोंडून विराटसाठीचे प्रेम कधीच व्यक्त झाले नाही. हे प्रेमी युगुल विवाहबंधनात अडकायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातम्यांकडेच आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्यांचे लग्न इटलीत होणार हे तर एव्हाना साऱ्यांनाच कळले आहे. पण नक्की कुठे होणार, मंडपाची सजावट कशी असणार याबाबत मात्र कोणाला काहीच माहीत नाही.

पण आम्ही आज तुम्हाला या राजेशाही थाटातील लग्नाच्या जागेचे काही फोटो दाखवणार आहोत. इटलीच्या टस्कान येथील निसर्गरम्य परिसरात विरुष्का सात फेरे घेणार आहेत.

हे एक पुरातन घर आहे, ज्याला आधुनिक स्वरुपात सजवण्यात आलं आहे. निसर्गरम्य परिसरात असलेला या व्हिलात लग्न करणं हे कोणासाठीही स्वप्नच असेल.

विरुष्काचे हे स्वप्न सत्यात उतरणार असेच म्हणावे लागेल. विरुष्काच्या लग्नस्थळी जाण्याचा रस्ताही तेवढाच सुंदर आहे. पाहुण्यांना निवांत बसण्यासाठी वाइन यार्ड व्ह्यू देण्यात आला असून ओपन डायनिंगचीही सोय करण्यात आली आहे.

या फोटोंमध्ये रॉयल व्हिलाच्या बाहेरील निसर्ग सौंदर्यही पाहता येत आहे. हा फक्त ऐतिहासिक व्हिला नसून यात अद्यावत सुखसुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. यात स्विमिंग पूलही आहे.

या भागातील हे आतापर्यंतचे सर्वात सुंदर लग्न मानण्यात येत आहे. हे संपूर्ण लग्न जिथे होणार आहे ती जागा आणि तिचा आजूबाजूच्या परिसरचा घेतलेला एरियल व्ह्यूही फार सुंदर आहे.

या व्हिलामध्ये स्विमिंग पुलसोबत जीम, इनडोअर गेम्स आणि आऊट डोअर गेम्सची सुविधाही उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी हे लग्न होणार आहे तो शाही व्हिला तर आपल्याला कळला. पण त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासही विरुष्काचे चाहते तेवढेच उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Photos of virat kohli anushka sharma tuscan wedding venue in italy