पतौडी खानदानाचा नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान हे त्यांचा लाडका मुलगा तैमुर याच्यासह पतौडी पॅलेसला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आज सकाळी मुंबई विमानतळावर हे कुटुंब दिसलं. येत्या २० डिसेंबरला छोटा नवाब म्हणजेच तैमुरचा पहिला वाढदिवस असल्याने हे कुटुंब हरयाणाला गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तैमुरच्या वाढदिवसाला खान आणि कपूर कुटुंबातील मंडळी तसेच काही जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच करिष्मा कपूरने सांगितले होते. तैमुरच्या वाढदिवसाचे फोटो समोर येईपर्यंत सध्या त्याचे विमानतळावरील फोटोच सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

यावेळी सैफ-तैमुर या बाप-लेकाच्या जोडीने एकसारखेच कपडे घातल्याचे दिसले. दोघांनीही निळ्या रंगाचे चेक्सचे शर्ट घातले होते. नुकतेच सोहा अली खानच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते. यादरम्यान तैमुरच्या वाढदिवसासाठी काय तयारी करण्यात आली आहे, असा सवाल माध्यमांनी केला. मात्र, करिना आणि सैफने अगदी शिताफीने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photos taimur ali khan is twinning with daddy saif as he heads to pataudi palace for first birthday celebrations
First published on: 16-12-2017 at 15:23 IST