एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारी रवीना टंडन मधली काही वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर होती. तिने २०२२ मध्ये ‘केजीएफ २’ मधून पुनरागमन केलं. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या कन्नड चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याशिवाय तिने नेटफ्लिक्सच्या क्राइम थ्रिलर वेब सीरिज ‘अरण्यक’मध्ये कस्तुरी डोगराची मुख्य भूमिका साकारली होती. रवीनाबद्दल आपल्या सर्वांनाच माहितीये, पण तिचे पती अनिल थडानी यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. अनिल थडानी हे फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. ते एए फिल्म्स या नॉन-स्टुडिओ डिस्ट्रीब्युशन कंपनीचे संस्थापक आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल थडानी यांच्या वितरण कंपनीने दक्षिणेतील चार बिग बजेट चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनचे हक्क विकत घेतले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’, राम चरणचा ‘गेम चेंजर’, प्रभास आणि दीपिका पदुकोणचा ‘कल्की 2898 एडी’ आणि जूनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान स्टारर ‘देवरा: भाग १’ यांचा समावेश आहे.

बेपत्ता गुरुचरण सिंगचं लग्न अन् आर्थिक अडचणींबाबत कुटुंबियांनी सोडलं मौन, म्हणाले…

थडानी यांच्या वितरण कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या चित्रपटांचे हक्क खरेदी करण्याबाबतची माहिती शेअर करण्यात आली होती. ‘मनी कंट्रोल’च्या एका रिपोर्टनुसार, एए फ्लिम्सने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २: द रुल’ उत्तर भारतात रिलीज करण्याच्या हक्कांसाठी २०० कोटी रुपये मोजले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, थडानींच्या एए फिल्म्सने रामचरण आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे हक्क ७५ कोटी रुपयांना घेतले. तर एए फिल्म्सने ‘देवरा: भाग १’ चे हक्क ५० कोटी रुपयांना विकत घेतले. तर कंपनीने नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ या पॅन इंडिया प्रोजेक्टचे हक्क १०० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

‘सैराट’ ला आठ वर्षे पूर्ण! अवघ्या चार कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने जगभरात कमावले होते तब्बल…

कोण आहेत अनिल थडानी?

अनिल थडानींचे वडील निर्माते व दिग्दर्शक कुंदन थडानी होते. ‘स्टंप्ड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनिल व अभिनेत्री रवीना टंडन यांची भेट झाली. रवीनाने २००३ मध्ये या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण केलं होतं. दोघांच्या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं, मग रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी २२ फेब्रुवारी २००४ रोजी उदयपूरच्या शिव निवास पॅलेसमध्ये लग्न केलं. त्यांना राशा आणि रणबीर ही दोन अपत्ये आहेत.

एए फिल्म्सची सुरुवात

अनिल थडानी यांनी एए फिल्म्सची सुरुवात १९९३ मध्ये केली होती. चित्रपट वितरक होण्याच्या निर्णयाबाबत थडानी यांनी एकदा इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. माझे कुटुंबीय बऱ्याच काळापासून वितरण व्यवसायात आहे. कौटुंबिक व्यवसायातून मी यातील बारकावे शिकलो. मग एक वेळ अशी आली की मला स्वतःचा काही वेगळा व्यवसाय करायचा होता. अनिल थडानींनी गेल्या ३० वर्षांत ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘अग्निपथ’, ‘केजीएफ’, ‘आशिकी २’, ‘दिल धडकने दो’, गली बॉय’, ‘राझी’ सारख्या चित्रपटाला सपोर्ट केला आहे.

रवीना अनिल थडानी संपत्ती

अनिल थडानी यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ‘लाइफस्टाइल एशिया’ च्या वृत्तानुसार, रवीना टंडनची अंदाजे एकूण संपत्ती १६६ कोटी रुपये आहे. तर त्यांचे पती अनिल थडानी यांच्या संपत्तीची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही.