हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचा हा आवडता अभिनेता पुन्हा एकगा कॅप्टन जॅक स्पॅरोच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला आतापर्यंत ८ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे. हा सिनेमा त्याच्या प्रत्येक भागामध्ये अधिकाधिक गंभीर होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ मिनिट १९ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये जॉनी डेप शेवटच्या काही क्षणांमध्येच दिसतो. त्यामुळे लवकरच या सिनेमाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करतील ज्याज जॅक स्पॅरोची व्यक्तिरेखा अधिक ठळकपणे दिसेल. सिनेमात जॉनी डेप ब्लॅक पर्ल नावाच्या जहाजाच्या दारुड्या कॅप्टन जॅक स्पॅरोची व्यक्तिरेखा साकारत आहे. समोरुन जरी जॅक दारुडा वाटत असला तरी तो चाणाक्ष बुद्धीचा असतो.

सिनेमाच्या या भागाची कथा भुतांच्या सेनेवर आधारित आहे. ट्रेलर पाहून तर असेच दिसते की, जॅकची सेना ही भुतांच्या सेनेशी लढत असते. या सिनेमाला ३डी, रिअल ३डी आणि आय मॅक्स ३डीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचे नाव पायरेट्स ऑफ द कॅरिबियनः डेड मेन टेल नो टेल्स असे आहे. या सिनेमातली अनेक दृश्यही फार थरारक आहेत.

३डी मध्ये सिनेमा बघायला आवडणाऱ्यांसाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असेल. या सिनेमाचे निर्माते जोकिम रॉनिंग आणि इस्पेन सँडबर्ग दिग्दर्शित हा सिनेमा २६ मे २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. हा एक फॅण्टसी आणि अॅक्शनपट सिनेमा आहे. जॉनी डेपशिवाय या सिनेमात ऑर्लेंडो ब्लूम, जेवियर बार्डेम, काया स्कोलैंड्रियो आणि जॉर्जी रश यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pirates caribbean 5 official trailer release johnny depp jack sparrow faces deadly combo
First published on: 03-03-2017 at 20:56 IST