‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. करोनाबाधित झाल्यानंतर त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. गेल्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पत्नी उमा ताम्हाणे यांचेही १९ एप्रिलला करोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांचे कु टुंब असा परिवार आहे. नाटककार-अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते भाऊ होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचे लेखन-निर्मिती शेखर यांनी केली होती. त्यांचे ‘तू फक्त हो म्हण’ हे नाटकही गाजले होते. ‘तिन्ही सांज’ हे नाटक अलीकडेच प्रदर्शित झाले होते, यात काही वेगळे तंत्रप्रयोगही त्यांनी केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playwright shekhar tamhane passes away abn
First published on: 30-04-2021 at 00:59 IST