अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ जिंकले असून त्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव केला. प्रसाद कांबळी हे २०१८ पासून २०२३ पर्यंत अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील. नाट्य परिषदेच्या इतिहासात प्रथमच ही पहिली निवडणूक होती ज्यात कोणतेही वाद झाले नाहीत. गुरुनाथ दळवी यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं.

मधुरा वेलणकर यांना सर्वात जास्त मतदान झाले. कार्यकारी समितीसाठी मधुरा वेलणकर, दिनकर रेगे, भरज जाधव, शंकर रेगे, अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, संदीप जंगम, उज्ज्वल देशमुख, गिरीश महाजन यांची निवड झाली. तर सहकार्यवाहसाठी ३ जागा होत्या. तिसऱ्या जागेसाठी टाय झाले होते. यावेळी चिढ्या टाकून ही कोंडी सोडवण्यात आली. अशोक ढेरे, सतीश लोटके आणि सुनील ढगे हे सहकार्यवाह म्हणून काम पाहतील. तर शरद पोंक्षे- मुख्य कार्यवाह, नाथा चितळे- कोषाध्यक्ष, नरेश गडेकर- उपाध्यक्ष, गिरीश ओक- उपाध्यक्ष प्रशासन म्हणून निवडण्यात आले.