मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे आपल्या बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते आपली मते निर्भिडपणे मांडताना दिसतात. अलिकडेच त्यांनी राज्यातील राजकारणावर आपल्या अनोख्या शैलीत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या प्रवीण तरडे यांनी “म्हणजे बघा मित्रांनो किती पैसा आहे राजकारणात; आणि आपण बसलोय शेती आणि शेतीवरचे सिनेमे करत” अशा शब्दात टीका केली.

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मिष्किल शब्दात केलेली ही टीका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री कोण होणार? या एका प्रश्नावरुन भाजपा शिवसेना या दोन राजकिय पक्षांमध्ये जोरदार वाक्युद्ध रंगले आहे. या राजकिय पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांचे विधान चर्चेत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी या फेसबुक पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या विधानावर आपली सहमती दर्शवली आहे. तर काहींनी त्यांच्या विचारांची खिल्ली देखील उडवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde politics of maharashtra marathi movie mppg
First published on: 06-11-2019 at 20:21 IST