मराठी चित्रपटात अनेक उत्तम विषय अलीकडे चांगल्या प्रकारे हाताळलेले दिसतात. एक वेगळा विषय असलेला सतीश रणदिवे दिग्दर्शित ‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट या मराठी सिनेमाचे पोस्टर लाँच नुकतंच कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले. एस. एन मुव्हीज निर्मित ‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट या चित्रपटाचा फर्स्ट लूक यावेळी दाखवण्यात आला.
‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट ही एक लव्ह स्टोरी असून या लव्ह स्टोरीत एक अनवट वळण येऊन आयुष्यच बदलवून टाकणा-या गोष्टी कशा घडत जातात याचा गुंगवून टाकणारा प्रवास पाहता येणार आहे. महाराष्ट्र व राजस्थान अशा दोन संस्कृतीचे दर्शन ‘प्रेमकहानी’ या चित्रपटातून घडणार असून लालचंद शर्मा निर्मित ‘प्रेमकहानी’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री काजल शर्मा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
योगेश, राजेश बामुगडे, प्रवीण कुवर यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना बेला शेंडे, शाल्मली खोलगडे, भारती मढवी, पामेला जैन, जावेद अली यांच्या स्वराचे कोंदण लाभले असून प्रवीण कुवर यांची संगीतसाथ आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी आशिष पाटील, ओंकार शिंदे, माया जाधव, कार्तिक पॅाल यांनी सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री काजल शर्मा व ‘महाराणा प्रताप’ फेम फैजल खान, यात मुख्य भूमिकेत असून उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, डॉ. विलास उजवणे, कौस्तुभ दिवाण, राकेश, वैष्णवी रणदिवे यांच्या भूमिकासुद्धा यात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premkahani ek lapleli goasht poster launch
First published on: 04-08-2015 at 11:24 IST