अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा प्रियकर निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाविषयीच्या बातम्या दररोज पाहायला मिळत आहेत. यामुळेच ती स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या यादीत ‘न्यूजप्रिंट मीडिया’मध्ये सर्वाधिक चर्चित अभिनेत्री झाली आहे.

प्रियांका- निकच्या लग्नात कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार, हे लग्न कुठे- केव्हा होणार, वर-वधू कोणते वस्त्र परिधान करणार अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याविषयीच्या बातम्या गेल्या आठवड्याभरात सातत्याने प्रत्येक भारतीय वृत्तपत्रात होत्या. गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर आता प्रियांका आणि निकचा विवाह चर्चेत आलाय. म्हणूनच तिस-या स्थानी असलेली प्रियांका लोकप्रियतेत अग्रणी स्थानावर आली आहे.

Kami Rita Sherpa
माउंट एव्हरेस्ट शिखर ३० वेळा पार करत मोडला स्वतः चा विक्रम; कोण आहेत कामी शेर्पा रीता?
swati maliwal assault case video
VIDEO : “…तर मी तुझी नोकरी खाईन”; मारहाण होण्यापूर्वी स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय घडलं?
BTS band Controversy k pop drama Hybe company Min Hee-jin
BTS बँडमध्ये आरोप-प्रत्यारोप, रडारडी आणि वाद; के पॉपच्या लोकप्रियतेला धक्का?
UK based pharmaceutical company AstraZeneca has started withdrawing its Covid 19 vaccine from markets around the world
कोव्हिशिल्ड लस दुष्परिणामांमुळे मागे घ्यावी लागली? ॲस्ट्राझेनेका म्हणते मागणीपेक्षा साठा अधिक!
india s manufacturing pmi slips to 58 8 in april
निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरून ५८.८ गुणांकावर
Prajjwal Revanna
सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लवकरच..”
bse sensex falls 188 59 points to settle at 74482 78
निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी
israil
लेख: गाझा संहार : अमेरिका काय करणार?

वाचा : भारताचा पहिला सुपरहिरो परतला; ‘शक्तिमान’ आता अॅमेझॉन प्राइमवर

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी सांगतात, ‘निक जोनास आणि प्रियांका चोप्रा दोघांचीही जगभरात लोकप्रियता आहे. यामुळेच वृत्तपत्रांमध्ये दीपिका-रणवीरपेक्षा जास्त निक- प्रियांकाला प्रसिद्धी मिळत आहे. प्रियंकाचा शाही विवाहसोहळा आणि त्याविषयी दरदिवशी येत असलेल्या बातम्यांमुळे ती न्यूजप्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चित स्टार ठरली आहे.’

१४ भारतीय भाषांमधील ६००हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून ही माहिती गोळा करत असल्याचं अश्वनी सांगतात. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.