पुणे : खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे ग्रामीण भागासाठी बुधवारपासून (२२ मे) पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दौंडला पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. हे पाणी दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या अडीच टीमएसी पाण्यापैकी आहे का, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत सध्या ६.१४ टीएमसी म्हणजे २१.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी कमी झाल्याने पुणेकरांवर कपातीची टांगती तलवार आहे. अशा वेळी दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यानुसार कपातीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाला दिलेले पहिले उन्हाळी आवर्तन नुकतेच पूर्ण झाले. दुसरे आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही, पण दौंड शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी झाल्यामुळे सध्या एक टीमएसी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Pune Metro, Swargate,
पुणे मेट्रो सुसाट…! स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

हेही वाचा…“बिल्डर कुटुंबाने पैशांच्या जोरावर गुन्हा पचवला होता, पण…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. याबरोबरच दौंड, इंदापूरसह पुरंदर आणि बारामतीच्या काही भागांनादेखील पाणी दिले जाते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ४ मार्चपासून पहिल्या आवर्तनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. हे पाणी ९ मेपर्यंत सोडण्यात आले. या कालावधीत ५.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आता पुन्हा २२ मेपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे रोजी ५०० क्युसेक, तर २३ मे रोजी ७०३ क्युसेकने पाणी नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्यात आले. दौंड शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत ६.१४ टीएमसी (२१.०६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. त्यांपैकी टेमघर धरणात ०.१६ टीएमसी (४.४५ टक्के), वरसगाव ३.१६ टीएमसी (२४.६४ टक्के), पानशेत १.९१ टीएमसी (१७.९७ टक्के) आणि खडकवासला ०.९० टीएमसी (४५.७२ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा…Pune Porsche Accident: “अल्पवयीन मुलाचा रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही, त्याने..”; काय म्हणाले आयुक्त?

दौंड शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नवीन मुठा उजवा कालव्यातून बुधवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एक टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.– श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

हेही वाचा…पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

धरणांतील पाणीसाठा

टेमघर : ०.१६ टीएमसी (४.४५ टक्के)
वरसगाव : ३.१६ टीएमसी (२४.६४ टक्के)

पानशेत : १.९१ टीएमसी (१७.९७ टक्के)
खडकवासला : ०.९० टीएमसी (४५.७२ टक्के)

एकूण : ६.१४ टीएमसी (२१.०६ टक्के)