मारुती सुझुकीच्या गाड्यांचे नाव नेहमीच मायलेजच्या बाबतीत घेतले जात असले तरी आता याच कंपनीच्या गाड्याच चांगल्या मायलेज देतात असं नाही तर आता टाटा मोटर्सच्या गाड्यांनीही मायलेजमध्ये नाव कमावण्यास सुरुवात केली आहे. जर आपण टाटा मोटर्सच्या सर्वोत्तम मायलेज कारबद्दल बोललो तर, तिची किंमत देखील खूप कमी आहे आणि त्यात मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत.

टाटाच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. विक्रीच्या बाबतीतही टाटाच्या कार आघाडीवर असतात. जबरदस्त फीचर्स, सुरक्षितता, मायलेज, लुक डिझाईन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ग्राहकही टाटाच्या कार ग्राहकांच्या पसंतीस येत असतात. त्यापैकीच एक टाटाची जबरदस्त कार आहे, जी बाजारपेठेत वर्चस्व गाजवित आहेत. आम्ही तुम्हाला ज्या कारबद्दल सांगत आहोत ती टाटाची Tiago CNG (Tata Tiago iCNG) आहे. तुम्ही Tiago iCNG पेट्रोल आणि CNG दोन्हीमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या कारमध्ये कोणते जबरदस्त फीचर्स आहेत.

Maruti Suzuki Brezza SUV
मायलेज २५.५१ किमी, मारुतीच्या ‘या’ स्वस्त SUV कारला बाजारपेठेत ग्राहकांची मोठी मागणी, किंमत फक्त…
What is STT levied on stock market transactions
शेअर बाजारातील व्यवहारांवर आकारला जाणारा ‘एसटीटी’ काय आहे? अर्थसंकल्पात त्यातील वाढ भांडवल बाजारासाठी निराशाजनक कशी?
Globally the price of gold has fallen by a thousand rupees
सोने हजार रुपयांनी स्वस्त
TVS XL100
किंमत ४४ हजार रुपये, मायलेज ५३ किमी, भारतातील बाजारपेठेत TVS च्या ‘या’ बाईकला मोठी मागणी
Mahindra Scorpio N Car
Tata Safari, XUV 700 नव्हे तर महिंद्राच्या ‘या’ सात सीटर सुरक्षित SUV कारला ग्राहकांची मोठी मागणी, किंमत…
Maruti Suzuki Car
मायलेज २६ किमी, ‘या’ ७ सीटर कारच्या खरेदीसाठी मोठी गर्दी; तुफान मागणीमुळे ४३ हजार कारची डिलीव्हरी पेंडिंग, किंमत…
NSE imposes 90 percent price ceiling for SME IPO
‘एसएमई आयपीओ’साठी एनएसईकडून ९० टक्के किंमत मर्यादेचा चाप
Best Selling Scooter
४८ किमी मायलेज, किंमत…; होंडाच्या ‘या’ स्कूटरला बाजारात तुफान मागणी, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा

Tata Tiago मायलेज

Tata Tiago iCNG बद्दल बोलायचे झाले तर, ही कार CNG मोडमध्ये २८.०६ किमी/kg (Tata Tiago iCNG मायलेज) पर्यंत मायलेज देते. तर पेट्रोलमध्ये त्याचे मायलेज २० kmpl पर्यंत आहे. केवळ मायलेजमध्येच नाही, तर ही कार अनेक बाबतीत चांगली आहे.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांना फुटला घाम! महिंद्राच्या ‘या’ स्वस्त ७ अन् ९ सीटर कारला दरमहिन्याला मिळतेय १० हजार बुकींग, किंमत… )

4-स्टार सुरक्षा रेटिंग

4 स्टार सेफ्टी रेटिंग (टाटा टियागो सेफ्टी रेटिंग) असलेली ही कार देशातील सर्वात सुरक्षित परवडणारी हॅचबॅक आहे. या कारच्या सर्व प्रकारांमध्ये दोन मानक एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, EBD सह ABS आणि कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

इंजिन आणि ट्रान्समिशन

Tata Tiago मध्ये CNG पर्यायासह १.२ लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये ७३.५ बीएचपी पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करते. कारसह ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलेली ही पहिली सीएनजी कार आहे.

किंमत किती?

Tata Tiago ची किंमत अशी आहे की ती तुम्हाला सहज परवडेल. या कारची किंमत ५.६५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ८.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात टाटा मोटर्सची अधिकृत सेवा केंद्रे आणि गोदामे आहेत, ज्यामुळे तुम्हाला त्याच्या सर्व्हिसिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. बाजारात या कारची स्पर्धा मारुती सेलेरिओ, वॅगन आर आणि सिट्रोएन सी3शी आहे.