आजकाल पाश्चात्य पद्धतीचे शौचालय (western toilets) सगळीकडेच पाहायला मिळतात. पण सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृहामध्ये पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयांमध्ये अस्वच्छता पाहायला मिळते. यावर अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला होता. या पोस्टमध्ये तिने अनेकदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी common toilets असतात. पुरूष या पाश्चात्य शौचालयाचा योग्य वापर करत नसल्यामुळे स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागतो असे म्हटले. त्यावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने कमेंट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुष्करने हेमांगीच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. “शाब्बास हेमांगी, खूप महत्त्वाच्या विषयावर उत्तम भाष्य केलंयस तू! अरे, आम्हा पुरुषांना सुद्धा लोकांच्या असल्या घाणेरड्या आणि बेपर्वा वागण्याचा त्रास होत असतो, तर तुम्हा स्त्रियांना किती होत असेल! खरंच लोकांनी आपापल्या सामाजिक वागण्याचा (Socail Behavior)चा नीट विचार करावा, आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, ह्याची काळजी घ्यायलाच हवी!” असे त्याने म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushakar shotri commented on hemangi kavi post avb
First published on: 11-08-2020 at 16:34 IST