ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खराब झाली होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण शोक व्यक्त करत आहे. नुकतंच काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका युगाचा अंत झाला, अशी भावना अनेक कलाकारांकडून व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री करीना कपूर, नीतू कपूर, शिल्पा शेट्टी, सुश्मिता सेन, गीता बसरा, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

navri mile hitlerla fame ajinkya date blessed with baby girl
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिली झलक शेअर करत म्हणाला, “इतकं भारावून जाणं…”
Maharashtrachi hasyajatra fame Prithvik Pratap first Digital Advertisement Released
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला मिळाली मोठी संधी, व्हिडीओ केला शेअर; प्राजक्ता माळीसह हास्यजत्रेचे कलाकार म्हणाले, “व्वा…”
aajji bai jorat marathi natak review by loksatta ravindra pathre
नाट्यरंग : आज्जीबाई जोरात – नव्या पिढीचं आधुनिक बालनाट्य…
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…

अभिनेत्री सुश्मिता सेन हिने याबाबत एक ट्वीट केले आहे. त्यात ती म्हणाली, “खरोखरच अविश्वसनीय… ती खऱ्या आयुष्यात फार चांगले आयुष्य जगली. तिला रंग आवडायचे, त्या रंगाच्या प्रत्येक छटा तिने अनुभवल्या. एका राणीचे मूर्त स्वरुप…!! ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय भावपूर्ण श्रद्धांजली.”

तर क्रिकेटपटू हरभजन सिंह याची पत्नी गीता बसेरा हिनेही याबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. “एक अतिशय दुःखद दिवस…. हा खरोखर एका युगाचा अंत आहे.. काय जीवन आणि काय ती स्त्री!! अत्यंत प्रामाणिकपणे आणि धैर्याने देशाचे नेतृत्व केल्याबद्दल तुमचे आभार.. तुम्ही त्याचे प्रतीक आहात. RIPQueenElizabeth”, असे ट्वीट गीता बसेरा हिने केले आहे.

अभिनेता रितेश देशमुख यानेही याबाबत एक ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणाला, “एका युगाचा अंत!! अत्यंत कठीण काळातही तिने आपली प्रतिष्ठा सोडली नाही. आज खरोखरच दुःखद दिवस आहे. त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या लोकांप्रती मी शोक व्यक्त करतो.”

तर करीना कपूर आणि अनुष्का शर्मा या दोघींनीही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबत शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती म्हणाली, “तुमचा आयुष्यातील प्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल. तुमच्यासोबतचा हा फोटो म्हणजे एक सन्मान होता. भावपूर्ण श्रद्धांजली.”

दरम्यान किंग जॉर्ज सहाव्या यांच्या मृत्यूनंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राणी एलिझाबेथ  राष्ट्रकूल देशांची राणी बनली. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आल्याने जराही न डगमगता आल्या प्रसंगाला ताठ मानेने राणी सामोरी गेली. १९५३ साली राणीच्या राज्याभिषेकाचे टीव्हीवरून प्रथमच प्रसारण करण्यात आले. किंबहुना या प्रसंगाचे औचित्य साधून अनेकांनी घरी टीव्ही विकत घेतले.  दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक मंदीमधून जाणाऱ्या इंग्लंडवर राज्य करताना राणीने बरेच चढ-उतार बघितले. हळूहळू इंग्लंडने औद्योगिकतेबरोबर ज्ञान-विज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात मोलाची प्रगती केली. ८० च्या दशकापासून इंग्लंडमधील राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतरे राणीने जवळून पाहिली