मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. ११ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी ७ कोटी ५३ लाखांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये ५० टक्क्यांची भर पडली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ११ कोटी ८३ लाखांची भरघोस कमाई केली. भारताता ‘राझी’ सिनेमाने आतापर्यंत १८ कोटी ८३ लाखांची कमाई केली आहे. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दोन दिवसांची सिनेमाची कमाई ट्विट करुन सांगितली आहे.

‘राझी’ सिनेमात आलिया भट्ट आणि विक्की कौशलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आलिया सहमत नावाच्या काश्मिरी मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. सहमत दिसायला अगदी साधीशी असली तरी फार चतूर असते. सिनेमात आलियाचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी (विक्की कौशल) लग्न होते. भारतातून पाकिस्तानात आलिया सून म्हणून जाते, पण तिचा मुळ उद्देश पाकिस्तानात जाऊन गुप्तहेरी करणं असतो. ती भारताचे डोळे आणि कान बनून पाकिस्तानात राहत असते.

raazi
राझी

हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर ‘राझी’ सिनेमाची कथा बेतलेली आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. ट्रेलरमध्ये आलियाचे एक आज्ञाधारक मुलगी, कुटुंबवत्सल पत्नी आणि निर्भीड गुप्तहेर असे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. तर विक्की कौशलही त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये खुलून दिसतो.