अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. जेव्हापासून या प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आलंय, त्यानंतर वेगवेगळ्या अभिनेत्रींनी लागोपाठ त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. प्रत्येक दिवसाआड राज कुंद्राच्याबाबतीत नव नवे खुलासे उघड होताना दिसून येत आहेत.

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, पोर्नोग्राफी रॅकेटच्या गॅंगची एक कॉन्ट्रॅक्ट कॉपी समोर आली आहे. या कॉन्ट्रॅक्ट कॉपीच्या माध्यमातून राज कुंद्रा आणि त्याची टीम बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या अभिनेत्रींना साइन केलं जात होतं. या कॉन्ट्रॅक्ट कॉपीनुसार, कोणतेही बोल्ड, इंटीमेट आणि न्यूड सीन्स शूट करण्याआधी अभिनेत्रींकडून सहमती गरजेची असते. यासाठी अशा राज कुंद्रा आणि त्याटी टीम या कॉन्ट्रॅक्ट कॉपीवर अभिनेत्रींना साइन करण्यासाठी सांगत होते.

पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात समोर आलेल्या या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये लिहिलंय की, “मला आनंद होतोय की, माझी एक कलाकार म्हणून नवी वेब सीरिज ………..(नाव) साठी १० हजार रूपयांच्या पॅकेजमध्ये निवड केली आहे. ही वेब सीरिज फ्लिज (Fliz) मूव्हीज या बॅनरखाली तयार करण्यात आली आहे आणि जगभरातील मुख्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. चर्चेदरम्यान ठरलेल्या शूटिंगच्या तारखा……..या आहेत. माझ्या सहमतीने मी या चित्रपटात इंटीमेट, एरोटिक, बोल्ड सीन्स ज्यात लिप लॉक, स्मूच सीन्स, टॉपलेस यासारखे न्यूड सीन्स करत असल्याची घोषणा करत आहे.”

यापुढे या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये लिहिलंय, “मी माझ्या इच्छेने हे सीन्स करण्यासाठी तयार आहे. माझ्यावर प्रोडक्शन हाउसची कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा दबाव नाही. मी घोषणा करते की, जर प्रोडक्शन हाउसने माझे एरोटिक, बोल्ड, टॉपलेस, न्यूड सीन्सना कोणत्या चित्रपटात, वेबसाईट्स किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर वापरले तरी माझी काही हरकत नाही. मी याविरोधात कोणत्याही प्रकरचा आरोप करणार नाही.”

raj-kundra-pornography-racket-case-contract-copy

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर आलेल्या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये कंपनीचं नाव देण्यात आलेलं नाही. तसंच कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आलेला नाही. धक्कादायक म्हणजे कोणत्या वेब सीरिजसाठी अभिनेत्रींना साइन करण्यात येतंय त्या वेब सीरिजचं नाव आणि रिलीज डेट सुद्धा लिहिण्यात आलेली नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊ इच्छिणाऱ्या महिलांना अशा प्रकारे टार्गेट करत त्यांच्याकडून हे कॉन्ट्रॅक्ट कॉपी साइन करून घेतलं जात होतं.

अभिनेत्रींकडून साइन करून घेतलेली ही कॉन्ट्रॅक्ट कॉपी दाखवून पॉर्न फिल्म शूट करण्यासाठी ब्लॅकमेल केलं जात होतं. एका वेब सीरिजमध्ये काम करण्याच्या नावाखाली अभिनेत्रींकडून हे कॉन्ट्रॅक्ट कॉपी साइन करून घेतलं जात होतं.