चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा राजकुमार यादवचा ‘न्यूटन’ हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ‘ऑस्कर’च्या परदेशी भाषेतील चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून अधिकृतपणे ‘न्यूटन’ची प्रवेशिका पाठवण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील २६ चित्रपटांमधून ‘न्यूटन’ला ऑस्करच्या शर्यतीत पाठवण्याचा निर्णय १४ सदस्यीय निवड समितीने घेतला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वीच ‘न्यूटन’ ऑस्करच्या शर्यतीत असल्याचे जाहीर करण्यात आल्याने दिग्दर्शक अमित मसुरकर आणि अभिनेता राजकुमार यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, हा चित्रपट ऑस्करमधून बाहेर पडल्याने आता तमाम भारतीयांची निराशा झाली आहे.

वाचा : उपकारांची परतफेड म्हणून या अभिनेत्याने आपल्या मित्रांना दिले ६ कोटी रुपये

हा चित्रपट मतदानाच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकला नाही. त्या गटात आता नऊ चित्रपट असून त्यांच्यावर मतदान होईल. त्या नऊ चित्रपटांत अ फँटास्टिक वुमन (चिली), इन दी फेड (जर्मनी), ऑन बॉडी अँड सोल (हंगेरी) फॉक्सट्रॉट (इस्रायल), दी इन्सल्ट (लेबनॉन), फेलिसाइट (सेनेगल), दी वुंड (दक्षिण आफ्रिका), दी स्क्वेअर (स्वीडन) यांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळालेले नाही. परदेशी चित्रपट गटात शेवटच्या पाच चित्रपटांत स्थान मिळवणाऱ्यात आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ या चित्रपटाचा समावेश आहे. मदर इंडिया (१९५८) व सलाम बॉम्बे (१९८९) या चित्रपटांना पहिल्या पाचात स्थान मिळाले होते. तामिळ चित्रपट ‘विसरनाई’ गेल्या वर्षी ऑस्करमध्ये भारताने पाठवला होता. ऑस्कर पुरस्कार सोहळा ४ मार्च रोजी होणार आहे.

वाचा : ‘होम मिनिस्टर’ला टक्कर देणार ‘नवरा असावा तर असा’

अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘न्यूटन’चे दिग्दर्शन केले होते. ‘व्यवस्था’ हा आपल्या एकूणच सामाजिक, सरकारी आणि अगदी वैयक्तिक नित्यक्रमासाठीही महत्त्वाचा असलेला असा शब्द. लोकशाही व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि आपली स्वत:च्या सोयीची व्यवस्था यात प्रत्येक जण इतका व्यवस्थित अडकला आहे की त्यातून बुद्धीच्या किंवा तर्काच्या आधारेही कोणी बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर तो इतरांच्या दृष्टीने वेडा ठरतो. या चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना दिग्दर्शक अमित मसूरकरने या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच या चित्रपटातून अचूक बोट ठेवले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkummar raos newton out of oscar race
First published on: 15-12-2017 at 13:39 IST