बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह ‘दिल है दीवाना’ या म्युझिक व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकताच या म्युझिक व्हिडीओचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अर्जुन आणि रकुलचा लूक चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दिल है दीवाना’ गाण्याचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने ‘एक प्रेम कहाणी जी मजामस्तीने भरली आहे. दिल है दीवाना गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. १७ एप्रिल रोजी गाणे प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : मलायका आणि अर्जुनचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

‘दिल है दीवाना’ या गाण्यामध्ये अर्जुन दोन भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘द गूड अँड द बॅड’ अशी झलक पाहायला मिळते. हा टीझर सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांमध्ये गाण्याविषयी उत्सुकता पाहायला मिळते.

‘दिल है दीवान’ हे गाणे दर्शन रावल आणि झारा खान यांनी गायले आहे. अर्जुन आणि रकुलच्या या गाण्याला तनिष्क बागचीने संगीत दिले आहे. हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे. या गाण्याची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakul preet singh and arjun kapoor dil hai deewana teaser avb
First published on: 15-04-2021 at 17:30 IST