रावणाने सीतेचे हरण केले आणि लंकेत जाऊन याच रावणाचा दशमीला रामाने वध केला. रामायण मालिकेत रावणाच्या वधाचा हा एपिसोड नुकताच पार पडला. रावणाच्या वधानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जल्लोष केला. ‘सर्वांत पहिला यशस्वी सर्जिकल स्ट्राइक’ म्हणत नेटकऱ्यांनी मीम्स पोस्ट केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रावण वधानंतर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी श्रीराम यांना वंदन केलं. तर काहींनी विजयादशमीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या. रामायणातील सर्वोत्तम दृश्य म्हणत नेटकऱ्यांनी फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा : करोनामुळे रेस्टॉरंट सर्व्हरचा मृत्यू; आलिया भट्टने लिहिली भावनिक पोस्ट

रामायण मालिकेसोबतच दूरदर्शनचे जुने दिवस परत आले असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण लॉकडाउनमध्ये ‘रामायण’ ही मालिका सुरू होताच दूरदर्शनच्या टीआरपीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. एक काळ गाजवणाऱ्या दूरदर्शनमधील जुन्या मालिकाचं पुन्हा प्रक्षेपण झाल्यानंतर या वाहिनीला पुन्हा लोकप्रियता मिळाली आहे. रामायण ही मालिका सगळ्यात जास्त पाहिली जाणारी मालिका ठरतेय, तर महाभारत ही मालिका देखील पहिल्या पाचमध्ये आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayan ravan vadh episode hailed by twitterati call it first ever successful surgical strike ssv
First published on: 18-04-2020 at 10:44 IST