‘गली बॉय’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’ यांसारख्या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे रणवीर अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेता झाला. यंदाच्या ‘हॅलो! हॉल ऑफ फेम’ या पुरस्कार सोहळ्यातही ‘सुपरस्टार ऑफ द इअर’चा किताब त्यानं पटकावला. बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्वत:चं स्थान पक्क केलेला रणवीर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. रणवीरनं स्वत: चे खास स्टिकर्स आणि GIF करून घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीरला नेहमीच चाहत्यांशी संपर्क साधायला आवडतो. त्यांच्या कॉमेंट्नां रिप्लाय देणं असो किंवा भेटून संवाद साधणं असो. आता या चाहत्यांना वेगळ्या प्रकारे उत्तर देण्यासाठी रणवीरने स्वत:चे स्टिकर्स आणि GIFs तयार करून घेतले असल्याचे समजत आहे. हे स्टिकर्स केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील त्याच्या चाहत्यांना वापरता येणार असल्याचं समजत आहे.

रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘८३’मध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२०ला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh has created his own special gifs and stickers for fans
First published on: 18-03-2019 at 18:02 IST