एमबीसीएलच्या पहिल्या दोन्ही दिवसांप्रमाणेच तिसऱ्या दिवसाची सरुवात उत्साहाच्या वातावरणात झाली. अंतिम फेरीचा सामना डॅशिंग मुंबई संघ आणि रत्नागिरी टायगर्स या संघांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल डॅशिंग मुंबई संघ ह्या संघाने जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ३ बाद ३९ अशी धावसंख्या उभारली. जिंकण्यासाठी रत्नागिरी टायगर्स समोर ४० धावांचे लक्ष्य होते. रत्नागिरी टायगर्सने यशस्वीपणे ते पूर्ण करून अंतिम फेरीचा विजेता होण्याचा बहुमान मिळविला. जल्लोषात सर्वांनी विजेत्या टीमचे अभिनंदन केले. ह्या अंतिम सामन्याचे सामनावीर ठरले आणि ह्यांना मालिकावीराचा सन्मान देवून गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : प्रथमेश कोळंबकर (डॅशिंग मुंबई संघ)
सर्वोत्कृष्ट फलंदाज : सिद्धांत मुळे (डॅशिंग मुंबई संघ)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : चेतन चव्हाण (अजिंक्यतारा सातारा)
वूमन ऑफ एम बी सी एल : मयुरा (रत्नागिरी टायगर्स)
मॅन ऑफ एम बी सी एल : नुपूर दुधवडकर (रत्नागिरी टायगर्स)
तृतीय क्रमांक संघ एम बी सी एल : मस्त पुणे संघ (सव्वा लाख रुपये + सन्मानचिन्ह)
द्वितीय क्रमांक संघ एम बी सी एल : डॅशिंग मुंबई संघ (सव्वा लाख रुपये + सन्मानचिन्ह)
प्रथम क्रमांक संघ एम बी सी एल : रत्नागिरी टायगर्स संघ (अडीच लाख रुपये + सन्मानचिन्ह)
Winner of MBCL 2016 Season 3 ratnagiri Tigers