PHOTO : ‘रेगे’ फेम आरोह वेलणकरचे हटके प्री-वेडिंग फोटोशूट

प्रसिद्ध सेट डिझायनर नितीन देसाई यांच्या सेटवर हे फोटोशूट करण्यात आले आहे.

आरोह वेलणकर, अंकिता शिंगवी
आली लग्नघटिका समीप…. हे सूर सध्या ‘रेगे’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला अभिनेता आरोह वेलणकरच्या कानात घुमत असतील. अगदी कमी वेळातच तरुणींच्या मनात घर करणारा हा अभिनेता आज त्याची प्रेयसी अंकिता शिंगवी हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे.

वाचा : पुढची दोन वर्षे विरुष्काच्या वैवाहिक जीवनासाठी कठीण?

आरोह-अंकिता महाबळेश्वर येथे डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो येण्यास थोडा अवकाश आहे. मात्र, आपल्या चाहत्यांचा विचार करता आरोहने त्यांच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अगदी हटके पद्धतीने केलेल्या या फोटोशूटमध्ये बॉलिवूड टच पाहावयास मिळतो. प्रसिद्ध सेट डिझायनर नितीन देसाई यांच्या सेटवर हे फोटोशूट करण्यात आले आहे. फोटोशूटसाठी ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘इंदू सरकार’ या चित्रपटांच्या आयकॉनिक सेटचा वापर करण्यात आला आहे.

वाचा : अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातलेल्या गाउनची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

काही दिवसांपूर्वीच आरोहने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली होती. त्यात तो म्हणालेला की, ‘ती माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. जवळपास आठ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. आमच्या नाटकाच्या ग्रूपमध्ये अंकिता कोरिओग्राफर होती. मुळात अंकिता एक खूप चांगली नृत्यांगना आहे. त्यावेळी मी नाटकाच्या ग्रूपमध्येच असायचो आणि ती मात्र खूप हुशार, ते ‘टॉपर’ वगैरे म्हणतात ना अगदी तशीच. पण, माझ्या या प्रवासात तिची मला फार साथ लाभली. सबमिशन्सच्या वेळीही अंकिताची मला फार मदत झाली, त्यानंतर आमचं नातं आणखीनच खुलत गेलं’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rege fame aroh welankar and ankita shingvi pre wedding photoshoot

ताज्या बातम्या