‘फिल्म फेअर’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा पुरस्कार पटकावणं हे प्रत्येक बॉलिवूड कलाकारचं स्वप्न असतं. चित्रपटांमधील अफलातून कामगिरीच्याच जोरावर या पुरस्कारावर नाव कोरता येतं. परंतु नोरा फतेही आणि रेमो डिसूझा यांनी चक्क हातापायी करुन फिल्म फेअर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या गंमतीशीर भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आयफा ट्रॉफी मिळवण्यासाठी रेमोसोबत खेचाखेकी करताना दिसत आहे. या भांडणात रेमो नोरावर भारी पडतो. तो तिच्याकडून ट्रॉफी हिसकाऊन घेतो आणि निघून जातो. असा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.