scorecardresearch

रेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या; बहीण म्हणाली, कधीच माफ करणार नाही…

लिझेलच्या भावाच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आले नसून समोर येत असलेल्या माहितीनुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Remo DSouza brother in law dies dead body found at home
(Photo: Jason Watkins/Instagram)

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर रेमो डिसूझा यांच्या मेहुण्याने आत्महत्या केली आहे. ४८ वर्षीय जेसन वॅटकिन्सचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरामध्ये सापडला आहे. रेमो डिसूझाचा मेहुणा जेसन वॅटकिन्स याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांच्यावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रेमो डिसूझाचा मेहुणा आणि त्याच्या पत्नीचा भाऊ जेसन वॉटकिन्सने जगाचा निरोप घेतला आहे. तो त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. जेसन वॅटकिन्सच्या निधनाने लिझेल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

जेसन वॅटकिन्स त्यांच्या मुंबईतील घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की जेसनला कूपर रुग्णालयात आणले आणि ओशिवरा पोलीस आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत. मात्र, रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांनी मृत्यूला दुजोरा दिला आहे.

जेसन वॅटकिन्स हा मुंबईतील मिल्लत नगर येथे राहत होता. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. जेसन वॅटकिन्स हा रेमो डिसोझा यांच्या पत्नी लिझेल डिसोझा यांचा भाऊ होता. गेल्या काही दिवसांपासून जेसनची प्रकृती बिघडल्याचेही बोलले जात आहे. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.

लिझेलच्या भावाच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आले नसून समोर येत असलेल्या माहितीनुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लिझेल डिसूझाने तिच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या  आहेत. इंस्टाग्राम स्टोरीवर पहिला फोटो शेअर करताना लिझेलने, ‘का…? तू माझ्याशी हे कसे करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही, असे म्हटले आहे. यासोबतच लिझेलने तिचा आणि तिच्या भावाच्या बालपणीचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिसरा फोटो शेअर करून लिझेलने तिच्या आईची माफी मागितली आहे.

जेसनचा फिल्म इंडस्ट्रीशी होता संबंध

जेसन वॅटकिन्स दीर्घकाळ चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. रेमो डिसूझासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. जेसनच्या मृत्यूला त्याच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीला धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Remo dsouza brother in law dies dead body found at home abn

ताज्या बातम्या