#Mauli Trailer : ‘आपल्या सारखा TERROR नाय’, रितेशच्या ‘माऊली’चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

रितेश देशमुख, माऊली

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जेनिलिया एकत्र येत ‘माऊली’ प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवादांचा समावेश करण्यात आला असून ‘आपल्या सारखा TERROR नाय’ हा रितेशचा संवाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

१४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. त्यामुळे ‘माऊली’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या संगीताने आसमंत दुमदुमणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Riteish deshmukh marathi movie mauli trailer released