संगीतकार सलीम मर्चेंट त्याच्या गाण्यांमधून अनेकांची मने जिंकत असतो. पण सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर सलीमचे हे फोटो पाहून कौतुक केले आहे.

सलीमने काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्याने दर्शन घेतानाचे काही फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने तू एकात्मतेचे उदाहरण आहे असे म्हणत सलीमचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुझ्या सारख्या आणखी १०० लोकांची गरज आहे असे म्हटले आहे.

सलीम आणि सुलेमान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटातील गाणी कम्पोज केली आहेत. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जौहरच्या ‘काल’ चित्रपटातील गाणी कम्पोज करत त्यांनी बॉलिवूडचा प्रवास सुरु केला. त्यानंतर त्यांनी ‘चक दे! इंडिया’, ‘भूत’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘मातृभूमि’, ‘फॅशन’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी कम्पोज केली.