‘दंगल’ सिनेमासाठी आमिरला सिक्स पॅक अॅब्सची गरज नसल्याचा सल्ला अभिनेता सलमान खानने दिला आहे. आमिर दंगल या त्याच्या आगामी चित्रपटात एका पेहलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काहि दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यात आपल्या मुलींना पेहलवानीचे धडे देताना तो दाखवण्यात आला होता.

अर्थात आमिरच्या या नव्या चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आमिरचा जूना मित्र आणि बॉलीवूड सूपस्टार सलमान याने एका मुलाखतीत आमिरच्या या नव्या चित्रपटाच्या पोस्टरच कौतुक केले आहे.

‘सिनेमाचे पोस्टर खूपच छान आहे पण ज्यात आमिरचे पिळदार शरीर दिसेल अशा पोस्टरची मला उत्सुकता आहे पण त्यासाठी सिक्स पॅक अॅब्सचा अट्टहास करण्याची गरज नाही  असेही मी आमिरला सांगितल्याचे सलमान खानने एका मुलाखतीत म्हटले आहे.

दंगलच्या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी आपण सलमान खानच्या ‘सुलतान’ सोबत हे पोस्टर प्रदर्शित करून अनेकांचे लक्ष खेचून घेणार आहोत अशाप्रकारचे वक्तव्य आमिरने केले होते.

तेव्हा ‘दंगल’ हा ‘सुलतान’च्या आधीपासून चर्चेत आहे अशी प्रतिक्रियाही सलमान खानने दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan advised aamir khan to not go for six pack abs in dangal
First published on: 16-07-2016 at 19:42 IST