सलमान खान आणि गोविंदा हे खरे एकमेकांचे ‘पार्टनर’ आहेत. कित्येक दशकांपासूनची त्यांची मैत्री आजही तशीच टिकून आहे. असे असले तरी त्या दोघांनी एकत्र असे फारसे सिनेमे केलेच नाही. पार्टनर हा त्यांचा सिनेमा तुफान गाजलेला. पण त्यानंतर या दोघांचा एकत्र एकही सिनेमा आला नाही. असे असतानाच गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला गोविंदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आ गया हिरो’ या गोविंदाच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्याचा हा सिनेमा खुद्द सलमान खानच प्रमोट करतोय. सलमानने आ गया हिरोचा ट्रेलर ट्विट करत म्हटले की, ‘आ गया मेरा हिरो. मेरा पार्टनर. सुंदर ट्रेलर.’

आता सलमान खानने त्याचा हा ट्रेलर ट्विट केला म्हटल्यावर गोविंदानेही त्याच तोडीस एक खास गोष्ट सलमानसाठी केली. गोविंदाने सलमानचा फार जुना फोटो ट्विटरवर शेअर करत त्याला छानसा मेसेजही लिहिला. गोविंदा म्हणाला की, जेव्हा सलमानने त्याचे करिअर सुरु केले त्या दिवसांतला हा फोटो आहे. काही मैत्री आणि काही माणसं आपल्या आयुष्यात नेहमीच राहतात.. पार्टनर. याच बरोवर गोविंदाने त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही ट्विटरवर शेअर केला. २०१६ वर्ष संपण्याआधी आ गया हिरोचा ट्रेलर खास तुमच्यासाठी.

https://twitter.com/Govinda_HeroNo1/status/814313360510464000

असे असले तरी इतर कलाकारांच्या तुलनेत गोविंदा फार कमी काम करताना दिसतो. यावर बोलताना २१ डिसेंबरला आपल्या वाढदिवसा दिवशी गोविंदाने सांगितले होते की, सध्या वेळ खराब चालली आहे. आपल्या वाढदिवसा दिवशी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तो म्हणाला की, मला सलमानच्या टीममध्ये जाण्यात काहीच स्वारस्य नाही. त्याच्या या वक्तव्याने त्याच्या आणि सलमानमध्ये दुरावा आले असे वाटत होते. पण सलमानने पुढाकार घेऊन त्यांच्यातला हा दुरावा नष्ट केला असेच म्हणावे लागेल.

गोविंदाचा ‘आ गया हिरो’ हा सिनेमा दिपांकर सेनापती यांनी दिग्दर्शित केला असून याचा निर्माता आणि लेखक स्वतः गोविंदाच आहे.