चौथीत असताना सलमानची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती; कारण…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला खुलासा

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सलमान खान याची चौथीत असताना शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती. खुद्द सलमाननेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. ‘द तारा शर्मा शो’ या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. आपल्या बालपणीच्या बऱ्याच गोष्टी सलमानने या मुलाखतीत सांगितल्या.

“लहानपणी माझा सांभाळ करणं आई-वडिलांना खूप कठीण गेलं. आताही कठीण जातं. माझा स्वभाव सुधारण्याचा मी फार प्रयत्न करतोय”, असं तो म्हणाला. यावेळी त्याने चौथीत असताना शाळेतून हकलण्यात आल्याचं सांगितलं. “खरंतर मला माहित नाही की नेमकं माझं काय चुकलं, पण चौथीत असताना मला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. मला दुसऱ्या शाळेत दाखल करण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला होता. मग मी आधी ज्या शाळेत होतो तिथे मला पुन्हा दाखल करण्यात आलं. तिथूनच मी माझं शिक्षण पूर्ण केलं”, असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा – भन्नाट किस्सा : दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडला पटवण्याच्या प्रयत्नात सलमान मिळाली पहिली जाहिरात

या कार्यक्रमात सलमानने त्याला पहिल्या जाहिरातीची ऑफर कशी मिळाली, याचा मजेशीर किस्सा सांगितला. दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडला पटवण्याच्या प्रयत्नात करिअरमधली पहिली जाहिरात मिळाल्याचं त्याने सांगितलं.

सलमानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समीक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan says he was thrown out of school in fourth grade ssv

ताज्या बातम्या