सलमान खानचा ‘वीरगती’ हा चित्रपट साऱ्यांनाच आठवत असेल नाही? या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा दडवालने स्क्रीन शेअर केली होती. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे तिने चाहत्यांची मन जिंकली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मध्यंतरी तिला क्षयरोग आणि फुफ्फुसांचा आजार झाल्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे सध्या तिच्या परिस्थितीमुळे चर्चेत आली आहे.
खरं तर बॉलिवूड कलाकार त्यांच्या लाइफस्टाइलसाठी जास्त चर्चेत असतात. महागड्या वस्तू, आलिशान घर आणि गाडी त्यांच्या या गोष्टींची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते. मात्र या साऱ्याला काही कलाकार अपवाद असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री पूजा दडवाल या साऱ्यापासून लांब आहे. इतकंच नाही तर सध्या ती ज्या परिस्थितीमध्ये जगते ते पाहून अनेकांना धक्का बसेल.

वाचा : पाहा आता कशी दिसते बॉलिवूडची ‘दामिनी’
एकेकाळी सलमान खानची अभिनेत्री असलेली पूजा प्रचंड हालाखीचं जीवन जगत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ती वर्सोवामधील एका चाळीत राहत असून एका कुटुंबाने तिला आश्रय दिला आहे. मात्र ती ज्या घरात राहते त्या घरातली धुणी-भांडी तिला करावी लागत आहेत. तसच घरातील अन्य लहान कामंदेखील करते.
वाचा : ’83’मधील रणवीरच्या ‘नटराज शॉट’वर भन्नाट मीम्स व्हायरल
दरम्यान, ‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
