With my fathers favourite actress….”The Ber (berries) Liyo, Meva Gareebon Ka Babe” song…Tanujaji…Tanu aunty. pic.twitter.com/lqM0IyUi0B
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 24, 2015
मोबाईल फोनला मागील कॅमेऱ्याबरोबरच पुढील कॅमेरा आला आणि सर्वत्र सेल्फीचे वारे वाहू लागले. यातून बॉलिवूडदेखील सुटले नाही. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान सध्या आइसलॅण्डमध्ये सुरू असलेल्या ‘दिलवाले’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. याच दरम्यान त्याने ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तनुजा यांची जेष्ठ कन्या काजोल ‘दिलवाले’मध्ये शाहरूखची सह-अभिनेत्री आहे. शाहरूखने तनुजाबरोबरचा सेल्फी टि्वटरवर पोस्ट केला असून, आपले वडील तनुजा यांचे चाहाते होते, असे फोटोसोबतच्या संदेशात म्हटले आहे.
आइसलॅण्डमधील काही अन्य फोटोदेखील शाहरूखने शेअर केले आहेत. २०१० साली आलेल्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटानंतर ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र आलेल्या शाहरूख आणि काजोल जोडीवरील चित्रपटातील गाणे या ठिकाणी चित्रित करण्यात येणार आहे.
Iceland…Gluggavedur, means window weather. My guide Gunnar tells me not exactly but my 1st day, so will go with it. pic.twitter.com/gJPU7oaBgr
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 24, 2015
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2015 रोजी प्रकाशित
शाहरूखचा तनुजाबरोबर सेल्फी!
मोबाईल फोनला मागील कॅमेऱ्याबरोबरच पुढील कॅमेरा आला आणि सर्वत्र सेल्फीचे वारे वाहू लागले. यातून बॉलिवूडदेखील सुटले नाही.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-08-2015 at 04:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan takes selfie with tanuja