‘कबीर सिंग’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. शाहिदने या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांच्या मनात घर केले आहे. आता ‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहिद कपूर लवकरच आणखी एका तेलुग चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी शाहिदने घेतलेली रक्कमही तगडी आहे.

या तेलुगू चित्रपटाचे नाव ‘जर्सी’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. ‘जर्सी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक २८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. या रिमेकचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

‘जर्सी’ चित्रपटासाठी शाहिदची निवड करण्याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक गौथम यांनी वक्तव्य केले आहे. ‘जर्सी  या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांसमोर आणताना मला आनंद होत आहे. तसेच राष्ट्रीय स्तारावर हा चित्रपट सादर करण्यासाठी मी फार उत्साही आहे. मुख्य चित्रपटातील जादू कायम ठेवण्यासाठी शाहिद कपूर हा सर्वात उत्तम अभिनेता असे मला वाटते’ असे दिग्दर्शक गौथम म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन आहे. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने निभावली आहे. चित्रपटात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. ‘जर्सी’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती अल्लु अरविंद, अमन गिल आणि दिल राजू करणार आहेत.