अभिनेता शरद केळकर हा एक विविधांगी भूमिका करणारा अभिनेता असून त्याने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही उल्लेखनीय यश मिळवलं आहे. गेल्या दशकापासून शरद केळकर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करत आहे. रामलीला: गोलियों की रासलीला या चित्रपटापासून ते अगदी आत्ताचा तान्हाजी द अनसंग वॉरियर, शरदने आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू दाखवून दिले आहेत. शरदने आपल्या एका मुलाखतीत बॉलिवूडबद्दल एक वेगळीच भीती बोलून दाखवली आहे.

नुकतंच शरदने इंडिया टुडे या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सांगितलं की दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बॉलिवूडचं महत्त्व कमी होऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे पुष्पा: द राईज. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना शरद म्हणाला, मला भीती वाटते की दाक्षिणात्य सिनेमामुळे बॉलिवूडचं महत्त्व कमी होईल. आपण आपली मुळं विसरत चाललो आहे. आपण पूर्णपणे वेगळ्या झोनमध्ये खूप जास्त आहोत. बरेच वेगवेगळे विषय आहेत. पण हिंदी चित्रपटांकडून लोकांना बॉलीवूड मसाला चित्रपट अपेक्षित आहेत. असे मसाला चित्रपट बनत नाहीत.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष

शरद केळकर पुढे म्हणाला, करोना काळामध्ये प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर ओटीटी माध्यमांवर चित्रपट, वेबसीरीज पाहत आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं पाहण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्यालाही काहीतरी वेगळं द्यावं लागेल. जास्तीत जास्त लोकांना भावेल, जास्तीत जास्त व्यावसायिक अंगाने विचार करावा लागेल, अधिकाधिक मनोरंजन कसं होईल हे पाहावं लागेल, काहीतरी खूप भव्य करावं लागेल.