scorecardresearch

सलमानच्या चित्रपटासाठी शहनाझ गिलनं मानधन म्हणून मागितली मोठी रक्कम? चर्चांणा उधाण

अभिनेत्री शहनाझ गिल सलमान खानच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

shehnaaz gill, salman khan, salman khan upcoming film, shehnaaz gill fees, kabhi eid kabhi diwali, aayush sharma, शहनाझ गिल, सलमान खान, कभी ईद कभी दिवाली, आयुष शर्मा, शहनाझ गिल मानधन, शहनाझ गिल चित्रपट
सलमान खानच्या चित्रपटातून शहनाझ गिल बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शहनाझ गिल यांच्यात एक बॉन्डिंग पाहायला मिळतं. अगदी बिग बॉसपासून ते सिद्धार्थ शुक्लाच्या निधनापर्यंत सलमान खान नेहमीच शहनाझला आधार आणि पाठिंबा देताना दिसला. त्यानंतर आता लवकर शहनाझ गिल सलमान खानचा आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये आयुष शर्मासोबत दिसणार असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर या चित्रपटासाठी तिने मोठी रक्कम मानधन म्हणून मागितल्याचीही चर्चा आहे.

सलमान खानच्या चित्रपटातून शहनाझ गिल बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चा असल्या तरीही अभिनेत्रीकडून अद्याप अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण जर या चर्चा खऱ्या असतील तर लवकरच शहनाझच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. पण आता शहनाझबाबत मानधनाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शहनाझ या चित्रपटासाठी तिला हवी असलेली रक्कम मेकर्सकडे मागू शकते असं बोललं जात आहे.

आणखी वाचा- Dhaakad Trailer : “जिस्म से रूह अलग करना बिझनेस है मेरा” बहुचर्चित ‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सलमान खानशी शहनाझ गिलचं नेहमीच चांगलं बॉन्डिंग असल्याचं पाहायला मिळालं आहे. शहनाझची निरागसता नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकते. पण आपल्याच याच स्वभावानं शहनाझनं सलमान खानचंही मन जिंकलं आहे. सलमान खाननं शहनाझला तिच्या कठीण काळातही पाठिंबा दिला आहे. अशात आता त्यानं तिला हवी असलेली रक्कम मानधन म्हणून मागण्याची सूट दिल्याचं बोललं जात आहे. मात्र सूत्रांच्या माहितीप्रमाणे शहनाझनं अद्याप मेकर्सना तिच्या मानधनाविषयी माहिती दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shehnaaz gill is in salman khan upcoming film kabhi eid kabhi diwali know about her fees mrj

ताज्या बातम्या