बिग बॉस पर्व १३चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल ही सर्वांची आवडती जोडी होती. त्यांनी लाखो लोकांच्या मनात घर केले होते. सध्या त्या दोघांचा इन्स्टाग्राम लाइव्हचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज मजेशीर अंदाजात सिद्धार्थला मारताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शहनाज आणि सिद्धार्थ मस्तीमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दरम्यान शहनाजने मजेशीर अंदाजात सिद्धार्थवर हात उगारला असल्याचे दिसत आहे. सिद्धार्थ काही वेळासाठी एकदम शांत होतो आणि नंतर दोघेही हसू लागतात.

 

View this post on Instagram

 

Always positive like #sidnaaz . . . #sidnaaz #shehnaazgill #sidharthshukla #sidnaazforever #sidnaazfam #stayblessed #stayhappy @realsidharthshukla @shehnaazgill

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by H€artb£@t_$idnaaz (@sidnaazmerijnn) on

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ शुक्ला आणि नेहा शर्माचा ‘दिल को करार आया’ हा म्यूझिक व्हिडीओ रिलिज होता. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला होता. तर शहनाज टोनी कक्कडच्या ‘कुर्ता पजामा’ या म्यूझिक अल्बमध्ये दिसली होती.